Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

6 तास का बंद होतं फेसबुक, इन्स्टाग्राम; समोर आलं कारण

6 तास का बंद होतं फेसबुक, इन्स्टाग्राम; समोर आलं कारण


कॅलिफोर्निया, 5 ऑक्टोबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook, WhatsApp आणि Instagram सोमवारी 4 ऑक्टोबर रोजी जवळपास 6 तास ठप्प झालं होतं. यापैकी कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर मेसेज जात नव्हते. 6 तासानंतर पहाटे 3 च्या सुमारास Facebook, WhatsApp आणि Instagram पुन्हा रिस्टोर झालं आहे. पण कोट्यवधी युजर्सचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अशाप्रकारे बंद होण्यामागे नेमकं कारण काय होतं? मिळालेल्या माहितीनुसार, Facebook, WhatsApp आणि Instagram या तीनही प्लॅटफॉर्म कंपनीच्या डोमेन नेम सिस्टममध्ये आलेल्या त्रुटीमुळे बिघाड झाला होता. त्यामुळे फेसबुकच्या मालकीचे हे Social Media Platforms ठप्प झाले असल्याची माहिती मिळते आहे.

काही तासांसाठी बंद झालेल्या या सोशल साइट्समुळे Facebook CEO मार्क झुकेरबर्ग यांना जवळपास 7 अब्जांचं नुकसान झालं आहे. त्यांच्या शेअर्सची किंमतही पाच टक्क्यांनी कमी झाली आहे.

DNS म्हणजे काय? नेमका काय झाला बिघाड - ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, DNS इंटरनेट फोनबुकप्रमाणे असतं.

हे एक असं टूल आहे, जे Facebook.com सारख्या वेब डोमेनला एका इंटरनेट प्रोटोकॉल किंवा IP Address मध्ये बदलतो. सोमवारी फेसबुकच्या DNS रेकॉर्ड्समुळे बिघाड झाला. ज्यावेळी DNS ची चूक असते, त्यावेळी Facebook.com युजरचं प्रोफाइल पेज बनणं अशक्य होतं. काय आहे BGP? फेसबुकमध्ये झालेला बिघाड ब्रॉडर गेटवे प्रोटोकॉल अर्थात BGP मुळे झाल्याचं ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

DNS इंटरनेटचं फोनबुक आहे, तर BGP पोस्टल सेवा आहे. ज्यावेळी एखादा युजर इंटरनेट डेटामध्ये एन्ट्री करतो, त्यावेळी ब्रॉडर गेटवे प्रोटोकॉल म्हणजेच BGP मार्ग ठरतो, जिथे डेटा ट्रॅव्हल करू शकतो. फेसबुक लोडिंग थांबण्याच्या काळी मिनिटं फेसबुकच्या ब्रॉडर गेटवे प्रोटोकॉल-BGP मार्गात बदल करण्यात आले होते. त्यामुळे आता BGP तील बिघाडचं सांगू शकतो, की फेसबुक DNS का फेल झालं. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.