महापालिकेच्या फटाकेमुक्त दिवाळी अभियानात 50 शाळांचा सहभाग: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आवाहनाला शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: मनपाक्षेत्रातील 50 शाळांच्या विद्यार्थ्यांनी घेतली फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ
सांगली: माझी वसुंधरा अभियानातंर्गत फटाकेमुक्त दिवाळीबाबत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शाळांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शुक्रवारी मनपा क्षेत्रातील 50 शाळांनी फटाकेमुक्त अभियानात सहभाग घेत आपल्या विद्यार्थ्यांना फटाके मुक्त दिवाळीची साजरी करण्याची शपथ दिली. त्यामुळे महापालिका क्षेत्रात यंदा शाळकरी विद्यार्थ्यांकडून फटाकेमुक्त दिवाळी साजरी होणार आहे.
शासनाच्या माझी वसुंधरा अभियानातंर्गत प्रदूषणमुक्त दिवाळीचा संकल्प सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी केला होता. याचाच एक भाग म्हणून येणारी दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले होते. यासाठी मनपा क्षेत्रातील शाळांची निवड करून विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केलेल्या आवाहनाला महापालिका क्षेत्रातील 50 हुन अधिक शाळांनी प्रतिसाद देत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली आहे. यामध्ये शाळांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेत येणाऱ्या दिवाळीत प्रदूषण टाळू आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करू असा निर्धार केला आहे. महापालिकेच्या या अभियानामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी होईल अशी अपेक्षा आहे. तसेच यामुळे वसुंधरेचे संवर्धन सुद्धा करता येणार आहे. या अभियानासाठी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्यधिकारी डॉ रवींद्र ताटे, पर्यावरण अभियंता ऋषिकेश किल्लेदार, वैष्णवी कुंभार, स्वच्छ सर्व्हेक्षण विभागाच्या शहर समन्वयक अधिकारी वर्षा चव्हाण यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे खातेप्रमुख यांनी सहभाग घेतला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.