Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय रिझर्व्ह बँक ने 'या' 2 बँकांना ठोठावला दंड, हा दंड का लावला.

 भारतीय रिझर्व्ह बँक ने 'या' 2 बँकांना ठोठावला दंड, हा दंड का लावला.


भारतीय रिझर्व्ह बँक  ने 26 ऑक्टोबर रोजी विविध नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोन सहकारी बँकांवर आर्थिक दंड ठोठावला. या दोन बँका म्हणजे वसई विकास सहकारी बँक, महाराष्ट्र आणि नागरीक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., जालंधर, पंजाब. काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने मंगळवारी महाराष्ट्रातील वसई विकास सहकारी बँकेला 90 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये कर्जाचे बुडित कर्ज (NPA) म्हणून वर्गीकरण आणि इतर सूचनांचा समावेश आहे.

याशिवाय नागरी सहकारी बँकेला उत्पन्नाची ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण, तरतूद या निकषांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सात लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

या कारणासाठी दंड आकारला

रिझव्‍‌र्ह बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, बँकेने कर्ज खात्यातील निधीचा अंतिम वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि कर्जाचे अनुत्पादित मालमत्ता किंवा NPA म्हणून वर्गीकरण करण्याच्या सूचनांचे पालन केले नाही. बँकेच्या खाते आणि नफा-तोटा खात्याच्या पुस्तकांवर तिच्या किमान तीन संचालकांनी स्वाक्षरी केली पाहिजे हे सुनिश्चित करण्यासाठी RBI च्या विशिष्ट निर्देशांचे देखील बँकेने पालन केले नाही.

31 मार्च 2019 रोजी बँकेची वैधानिक तपासणी, तिचा तपासणी रिपोर्ट आणि बँकेच्या आर्थिक स्थितीशी संबंधित सर्व पत्रव्यवहार तपासल्यानंतर हा खुलासा समोर आला आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

PPBL ला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे

यापूर्वी,भारतीय रिझर्व्ह बँक ने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड  वर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. 1 ऑक्टोबर 2021 च्या आदेशानुसार, सेंट्रल बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. RBI ने एका निवेदनात म्हटले आहे की, Paytm पेमेंट बँकेवर पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम एक्ट, 2007 (PSS Act) च्या कलम 26 (2) अंतर्गत गुन्ह्यासाठी हा दंड ठोठावला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.