माझी वसुंधरा" अभियानाबाबत सामाजिक संस्थांची 26 ऑक्टोबर रोजी महापालिकेत बैठक: उपायुक्त राहुल रोकडे
सांगली: शासनाच्या माझी वसुंधरा" अभियानात सामाजिक संस्थांचे योगदान याबाबत मनपाक्षेत्रातील सामाजिक संस्थांची मंगळवार 26 ऑक्टोबर रोजी महापालिकेत मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत "माझी वसुंधरा" अभियान सुरू केले आहे. या अभियानामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील सामाजिक संस्था आपले योगदान कसे देऊ शकतात , याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि.२६/१०/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील सभागृह, सांगली मुख्यालय येथे सदर अभियाना अंतर्गत बैठक आयोजित करण्यात आली असून सदर बैठकीस आपण उपस्थित रहावे असे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.