Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

या महिन्यात चौथ्यांदा महाग झाले पेट्रोल-डिझेल: देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे.

  या महिन्यात चौथ्यांदा महाग झाले पेट्रोल-डिझेल: देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे.

नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या वेगानं तेलाच्या किमतींमध्ये (Crude Oil) वाढ होत आहे, त्याचप्रमाणे देशातील इंधनाच्या किमतीतही वाढ करण्यात येत आहे. आजही पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दर वाढ झाली ​​असून सरकारी तेल कंपन्यांनी आज दिल्लीत डिझेलच्या दरात 30 पैशांनी आणि पेट्रोलच्या दरात 25 पैशांनी वाढ केली आहे. या वाढीसह पेट्रोल 102.70 रुपये आणि डिझेल 91.13 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे. या महिन्यात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रति लीटर पार गेले आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) नं दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या दरांमध्ये आज झालेल्या वाढिनंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 102.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 91.07 रुपये प्रति लिटर झाले आहेत. देशाच्या चार महानगरांची तुलना केली तर मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमती सर्वाधिक आहेत.

महागल कच्चे तेल

ओपेकच्या (OPEC) सदस्य देशांच्या कालच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे काही मिळाले नाही. कच्च्या तेलाची मागणी जसजशी वाढत आहे, तसतसे त्याचे उत्पादनही होईल, अशी अपेक्षा होती. पण ओपेकने दररोज केवळ चार लाख बॅरल्सने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर सुमारे अडीच टक्क्यांनी वाढले आहेत. मार्केट बंद झाल्यावर, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 81 च्या वर गेला. तज्ञांच्या मते, कच्चे तेल $ 90 पर्यंत जाऊ शकते.

देशातील महत्त्वाची शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

शहर पेट्रोल             डिझेल

दिल्ली 102.64     91.07

मुंबई        108.67     98.80

कोलकाता 103.36     94.17

चेन्नई         100.23     95.59


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.