सरकारकडून महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ
मुंबई : राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारकडून महागाई भत्त्यात 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 19 लाख अधिकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून या सर्वांची दिवाळी गोड जाणार आहे.
करोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गेल्या वर्षभरापासून गोठवण्यात आला होता. हळहळू करोना कमी होत जात असून सर्व पुर्वपदावर येत आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारत जात आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
1 जुलैपासून सरकारी कर्मचाऱ्यांना 17 टक्क्यांऐवजी 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. दिवाळी सणाच्या आधी राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी देत या सर्वांची दिवाळी गोड केली आहे.
ऑक्टोबरपासून हा वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार असून जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबतही राज्य सरकार सकारात्मक असून यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत. दरम्यानच्या पाच महिन्यातील 10 टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकीही ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.