शिधापत्रिकेस आधार जोडणी 100 टक्के पूर्ण करा - उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी लाभार्थ्यांची कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्या
सांगली, दि. 26, : रास्तभाव दुकानदारांनी सर्व लाभार्थ्यांना वेळेत, चांगल्या प्रतीचे धान्य वितरीत करावे. दुकानांमध्ये स्वच्छता ठेवावी, शिधापत्रिकेस आधार जोडणी 100 टक्के पूर्ण करावी. लाभार्थ्यांची कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पुणे विभागाचे उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात पुणे विभागाचे उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली व त्यांच्या अधिनस्त सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी किरण कुलकर्णी, आयएओ विभागाचे श्री. गंगाखेडकर, श्री. सरडे, विभागीय गोदाम निरिक्षक, सांगली जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांचे सर्व तालुक्यातील प्रतिनिधी व पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त (पुरवठा) त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगली जिल्ह्यातील पुरवठा विभागाची सर्व कार्यालये यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयामधील पुरवठा विभाग, पुरवठा निरिक्षण अधिकारी कार्यालय व जिल्ह्यातील सर्व 1 हजार 356 रास्तभाव दुकानांना आयएसओ मानांकन मिळवण्याचा मानस व्यक्त केला. यासाठी पुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिेलेली कार्यालयीन व नागरीकांची सर्व कामे वेळेत पूर्ण करावती, दप्तर व्यवस्थित ठेवावे अशा सूचना दिल्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.