मुश्रीफांच्या घोटाळ्यात पहिल्यांदाच शरद पवारांना ओढलं, किरीट सोमय्यांनी थेट नाव घेतलं!
कोल्हापूर: हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले, त्याचा हिशेब अजून का दिला नाही? शरद पवार साहेब ही तुमची व्यूहरचना आहे का?' असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. सेनापती घोरपडे कारखाना आणि या कारखान्यात 50 कोटींचे व्यवहार झाले आहेत. हे सरकार शरद पवार चालवतात. त्यामुळे याची माहिती त्यांना आहे. हे सरकार पवार आणि ठाकरे चालवतात. गृहमंत्री राष्ट्रवादीचे आहेत, मग किरीट सोमय्यांनी जेरबंद कुणी केलं? असंही त्यांनी विचारलं.
जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत
भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कराडमध्ये उतरवलं. सोमय्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यासंबंधित पाहणीसाठी सोमय्या महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला निघाले होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत जिल्हाबंदी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवलं. त्यानंतर सोमय्यांनी कराड शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला.
127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले
'मूळ विषय आहे की हसन मुश्रीफ साहेब 127 कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँड्रिंगचे आले, त्याचा हिशेब अजून का दिला नाही? शरद पवार साहेब ही तुमची व्यूहरचना आहे का? मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो.' असं सोमय्या म्हणाले.
घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार
'मी पुन्हा सांगतो, सरसेनापती घोरपडे कारखान्यात 98 कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे 2 कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे. मुश्रीफांना आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आपला आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा. मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, 100 कोटी रुपये घेतले. गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार' असं सोमय्या म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.