Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सुंदरनगर वेश्यावस्तीत स्वच्छतेचा संदेश देत वारांगनानी साजरा केला हृदय दिन

 सुंदरनगर वेश्यावस्तीत स्वच्छतेचा संदेश देत वारांगनानी साजरा केला हृदय दिन

सांगली : सांगलीच्या सुंदरनगर वेश्या वस्तीतील महिलांनी स्वच्छतेसोबत आजचा हृदय दिन साजरा केला. यावेळी महापालिकेकडून याठिकाणी कचरा विलगीकरण आणि वर्गीकरणबाबत जनजागृती केली. यावेळी वारांगना महिलांनी हातात हृदयाची छायाचित्रे घेत स्वच्छतेचा संदेश देत जागतिक हृदय दिन साजरा केला. तसेच महापालिकेच्या कचरा वर्गीकरणं अभियानात सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आयोजन केले होते. स्वच्छता निरीक्षक पंकज गोंधळे आणि टीम सहभागी झाली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.