Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलची दरवाढ!

 जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल, पेट्रोलची दरवाढ!


जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोलमध्ये झालेली दरवाढ! अशा शेलक्या शब्दांत काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांनी वाढत्या महागाईवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. सरकारने इंधनाच्या किमतीत तेल ओतून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

वाढत्या महागाईवरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला. जीडीपीमध्ये वाढ झाल्याचा दावा सरकार करत आहे. जीडीपी म्हणजे गॅस, डिझेल व पेट्रोलच्या दरात झालेली वाढ!

2014 मध्ये यूपीए सरकारने सत्ता सोडली तेव्हा गॅस सिलिंडर 410 रुपयांना मिळत होता. आता सिलिंडरची किंमत 885 रुपये झाली असून ही वाढ तब्बल 116 टक्के आहे. पेट्रोलच्या किमतीत 42 टक्के तर डिझेलच्या किमतीत 55 टक्के वाढ झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.