Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय गांधी निराधार योजनेबाबत वंचित लाभार्थ्यांना प्रबोधन करणेसाठी राष्ट्रवादी आपल्या दारी या संकल्पनेचा शुभारंभ

संजय गांधी निराधार योजनेबाबत वंचित  लाभार्थ्यांना प्रबोधन करणेसाठी  राष्ट्रवादी आपल्या दारी या  संकल्पनेचा शुभारंभ  


मा ना जयवंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत झालेल्या संजय गांधी निराधार योजनेबाबत वंचित  लाभार्थ्यांना प्रबोधन करणेसाठी  राष्ट्रवादी आपल्या दारी या  संकल्पनेचा शुभारंभ आज शांतीनगर परिसरातील सर्व माता भगिनींचा मेळावा घेऊन पार पडला  या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना सांगलीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा ज्योती आदाटे उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हणाल्या की या भागातील तरूण तडफदार कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस  अर्जुन कांबळे नी या भागातील महिलांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवुन देता यावा यासाठी धडपड करीत आहेत त्याबद्दल त्यांचे  विशेष कौतुक केले त्यानंतर त्या भागातील  महिला भगिनीच्या  समस्या जाणुन घेतल्या त्यावर बोलताना त्या म्हणाल्या कि जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा कोणत्याही दलालाकडे प्रस्ताव करण्यास देऊ नये हा प्रस्ताव करताना शासनाच्या सर्व अटी नियमांचा काटेकोरपणे पालन करावे.तसेच हा उपक्रम राबविण्यासाठी विविध भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आवाहन केले तसेच त्यांनीच पुढे होऊन या लाभार्थ्यांना प्रस्ताव करून देण्यासाठी सहकार्य करावे.


या आवाहनानंतर अर्जुन कांबळेनी या भागातील सर्व प्रस्ताव स्वतः लक्ष घालुन पुर्ण  करून देण्याचे अभिवचन या कार्यक्रमांतर्गत दिले तसेच इतर भागात ही असे मेळावे घेणार असुन आपण व आपली समिती यावे अशी विनंती केली या कार्यक्रमात दिव्यांग महिला विधवा परित्यक्ता घटस्फ़ोटीता कुमारिका दुर्धर आजार असलेल्या माता भगिनीचा तसेच वृध्द निराधार यांचा समावेश होतां  यावेळी मिरजच्या अध्यक्षा वंदना चंदनशिवे यांनीही मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास महिला आघाडीच्या सरचिटणीस प्रियांका तुपलोंडे युवती च्या सरचिटणीस प्रणोती हिंगलजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ट कार्यकर्ते अॅड विलास बेले इ कार्यकर्ते उपस्थित होते


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.