Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचे प्रस्ताव त्वरीत सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी पूर्ण झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे द्या

जिल्हा वार्षिक योजनेतील कामांचे प्रस्ताव त्वरीत सादर करा - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी पूर्ण झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे द्या


सांगली, दि. 29,  :
गतवर्षी सन 2020-21 च्या जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर असलेल्या पण निधी उपलब्ध न झालेल्या कामांसाठीचे प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी त्वरीत सादर करावेत. तसेच जिल्हा वार्षिक योजनेमधून जी कामे पूर्ण झाली आहेत अशा कामांचे निधी मागणीचे प्रस्तावही तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

सन 2021-22 ची जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, सार्वजनिक बांधकाम मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, सार्वजनिक बांधकाम (पश्चिम) विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. काटकर, यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2020-21 चा आराखडा 285 कोटींचा होता. गतवर्षी झालेल्या कामांचे संबंधित यंत्रणानी स्पीलचे प्रस्ताव प्राधान्याने सादर करावेत. जसजसा निधी उपलब्ध होईल तसतसा निधी वितरीत करण्यात येईल. त्यासाठीचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. यावेळी त्यांनी यावर्षीच्या आराखड्यात मागणी केल्यानुसार कामांचे प्रस्ताव यंत्रणांनी कामांचे प्राधान्यक्रम ठरवून त्वरीत सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हाधिकारी स्तरावरील योजना, जिल्हा परिषद स्तरावरील योजना, खासदार स्थानिक विकास कार्यक्रम, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम यामधील विविध कामांचा आढावा घेतला. अपांरपारीक ऊर्जा विकासात्मक बाबींवर बोलताना अंगणवाडी, शाळा, पाणीपुरवठा योजना, सौर ऊर्जेवर सुरू करण्यासाठी अनुषांगिक प्रस्ताव सादर करावेत. ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे अशा ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माझी शाळा आदर्श शाळा अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या शाळा, महानगरपालिकेकडील शाळा यामध्ये व्यायाम शाळा व क्रीडांगण विकास कामे प्राधान्याने करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. कोविड उपाययोजना अंतर्गत देयके अदा करणे बाकी असलेल्या कामांसाठी निधीची मागणी त्वरीत करावी. तसेच या वर्षीच्या आराखड्यानुसार ही कोवीड उपाययोजनांची संबंधित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत,आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत कामे करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करून प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशित करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी गतवर्षी झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधित यंत्रणांनी त्वरीत सादर करावीत असे निर्देशित केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.