Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शासकीय महाविद्यालय मिरज यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांना वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सातारा येथून तत्काळ कार्यमुक्त करुन त्यांना पूर्ववत मिरज येथे रुजू करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.

शासकीय महाविद्यालय मिरज यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांना वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सातारा येथून तत्काळ कार्यमुक्त करुन त्यांना पूर्ववत मिरज येथे रुजू करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.


सांगली दिनांक 7 सप्टेंबर  :-  शासकीय महाविद्यालय मिरज यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांना वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सातारा येथून तत्काळ कार्यमुक्त करुन त्यांना पूर्ववत मिरज येथे रुजू करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज व या महाविद्यालयास संलग्न असलेले रुग्णालय ही पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकिय दृष्ट्या अत्यंत महत्वाची संस्था आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातून हजारो रुग्ण विविध उपचाराकरिता दररोज येथे येत असतात. परंतु महाराष्ट्र शासनाने या महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे प्रतिनियुक्तीने पदस्थापना दिली आहे. यामुळे या सर्वांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात पदस्थापना केलेल्या अध्यापकांना मे महिन्यापासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. इतक्या मोठया प्रमाणात डॉक्टर्स या संस्थेमधून गेल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची व येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने समर - २०२० व समर २०२१ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या जागांचे  प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मार्फत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांना सादर केलेले आहेत. त्या अनुषंगाने ऑगष्ट २०२१ व सप्टेंबर २०२१ मध्ये संबंधीत प्रात्यक्षिक परिक्षा निरीक्षणे होणार आहेत. परंतु संबंधीत विषयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांचे अभावी विषयांच्या जागा / विषय Recognition होणार नाहीत. यामुळे भविष्यात संबंधीत विषयातील प्रवेशित पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना Recognition प्रमाणपत्र निर्गमित करता येणार नाहीत. त्यामुळे कोर्ट केस होणे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. यामुळे  शासनास एक नवीन संस्था सुरु करताना इतर काही संस्था बंद करण्याची वेळ येऊ शकते.

यामुळे शासकीय महाविद्यालय मिरज यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांना वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सातारा येथून तत्काळ कार्यमुक्त करुन त्यांना पूर्ववत मिरज येथे रुजु करणेबाबत संबंधीतांना आदेश द्यावेत अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.