Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना मदत वाटपासाठी निधी वितरणासाठी उपलब्ध -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना मदत वाटपासाठी निधी वितरणासाठी उपलब्ध -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


सांगली, दि. 21,  : जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे मृत जनावरांसाठी मदत, पुर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, झोपडी, गोठे, मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी अर्थसहाय्य, मत्स्यबीज शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार, टपरीधारक व कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याकरिता शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यासाठी वाढीव निधीसह एकूण 133 कोटी 79 लाख 89 हजार रूपये इतका निधी वितरीरणासाठी उपलब्ध झाला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

बाबनिहाय  वितरणासाठी उपलब्ध निधी पुढीलप्रमाणे. हस्तकला/हातमाग कारागीर/बारा बलुतेदार यांना मदतीसाठी SDRF च्या दराने मदत देण्यासाठी अनुदान 29 लाख 44 हजार, वाढीव दराने मदत देण्यासाठी अनुदान 3 कोटी 40 लाख 60 हजार असे एकूण 3 कोटी 70 लाख 4 हजार. दुकानदार यांना मदत 55 कोटी 19 लाख 70 हजार, टपरीधारक यांना मदत 48 लाख 80 हजार, कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत 4 लाख 35 हजार, मदत छावणीमध्ये आश्रय घेतलेल्या व्यक्तींकरीता तात्पुरती राहण्याची व्यवस्था, अन्नधान्य, कपडे, औषधोपचार इत्यादी करीता 50 लाख 97 हजार, सार्वजनिक क्षेत्रातील जमा झालेला कचरा व ढीगारे उचलणे 3 कोटी 48 लाख 52 हजार रूपये.

वाढीव निधी पुढीलप्रमाणे. नैसर्गीक आपत्तीमध्ये घरे पूर्णता क्षतीग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी /वस्तुकरीता अर्थसहाय्य वाढीव दराने मदत देण्यासाठी अनुदान 47 कोटी 94 लाख 53 हजार, मृत जनावरांना मदत SDRF च्या दराने मदत देण्यासाठी अनुदान 26 लाख 20 हजार, वाढीव दराने मदत देण्यासाठी अनुदान 8लाख 31 हजार असे एकूण 34 लाख 51 हजार, पूर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, नष्ट झालेल्या झोपड्या व गोठ्यांसाठी अनुदान SDRF च्या दराने मदत देण्यासाठी अनुदान 7 कोटी 67 लाख 10 हजार, वाढीव दराने मदत देण्यासाठी अनुदान 10 कोटी 52 लाख 21 हजार, असे एकूण 18 कोटी 19 लाख 31 हजार, शेतजमिनीच्या नुकसानीसाठी अर्थसहाय्य 2 कोटी 37 लाख, मत्स्‌य व्यवसायिकांसाठी मदत SDRF च्या दराने मदत देण्यासाठी अनुदान 94 लाख 29 हजार, वाढीव दराने मदत देण्यासाठी अनुदान 57 लाख 87 हजार, असे एकूण 1 कोटी 52 लाख 16 हजार रूपये.

SDRF  निधी 15 कोटी 53 लाख 52 हजार, राज्य शासन निधी 118 कोटी 26 लाख 37 हजार, असे एकूण अनुदान 133 कोटी 79 लाख 89 हजार रूपये उपलब्ध झाले  आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.