माहिती कार्यालये अधिक सक्षम व सुसज्ज करण्यावर भर देणार-माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांची सांगली जिल्हा माहिती कार्यालयास सदिच्छा भेट
सांगली, दि. 23 : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रसार माध्यमांव्दारे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम जिल्हा माहिती कार्यालयांतून अधिक प्रभावी व्हावे, यासाठी माहिती कार्यालये अधिक सक्षम सुसज्ज करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केले.
डॉ. संभाजी खराट यांनी आज जिल्हा माहिती कार्यालय, सांगली येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले. यावेळी माहिती सहायक रणजित पवार, शंकरराव पवार, सुधीर पाटील, बन्सीलाल मांडवे, नागेश वरूडे आदि उपस्थित होते.
कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेवून माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट म्हणाले, शासनाच्या प्रचार व प्रसिध्दीचे कामकाज अभ्यासपूर्ण व अधिक लोकाभिमुख करावे. शासकीय कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सौजन्यपूर्ण सेवा द्यावी. कार्यालयीन कामकाज करताना प्रत्येक विषय समजून घेवून जनहित जोपासावे.
डॉ. संभाजी खराट यांनी नुकताच माहिती उपसंचालक कोल्हापूर विभागाचा नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी मुंबई, कोल्हापूर, कोकण भवन, रत्नागिरी, ठाणे, मंत्रालय या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी तसेच वरिष्ठ सहायक संचालक पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. माहिती व जनसंपर्क विभागात समाज माध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसेच शासनाचे मुखपत्र असणाऱ्या लोकराज्य मासिकाच्या संपादक पदीही त्यांनी यशस्वीरित्या कामकाज केले आहे. डॉ. खराट यांनी पत्रकारितेत पीएच. डी. केली असून त्यांची 25 पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.