Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रवादी आपल्या दारी

राष्ट्रवादी आपल्या दारी


राष्ट्रवादी आपल्या दारी ही संकल्पना घेऊन संजय गांधी निराधार योजनेचा खणभागातील एरियात भव्य महिला मेळावा पार पडला.मा ना.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज  आणि युवक अध्यक्ष राहुल पवार यांच्या सहकार्याने खणभागातील झुंजार कार्यकर्ते गॅब्रियल तिवडे यांनी सामाजिक बांधिलकी  यांच्या वाढदिवसानिमित्त संजय गांधी निराधार योजनेच्या  महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या  भागातील सर्वच वंचित  लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी स्वतः गॅब्रियल यांनी याचे नियोजन केले यावेळी प्रस्तावना करताना गॅब्रियल म्हणतात की अनेक दिवसांपासूनची माझी इच्छा होती की माझ्या भागातील जे कोणी या योजनेच्या लाभापासुन वंचित असतील त्यांना तो लाभ मिळवुन देता आला पाहिजे यासाठी आमच्या सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा आणि या समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांचेशी संपर्क साधून माझी तळमळ व्यक्त केली त्यांनी तात्काळ या मेळाव्यात येण्याचे मान्य केले अशा या कोरोनाच्या काळात सुध्दा जीवाची पर्वा न करता त्या आपल्या माताभगिनीच्या प्रश्नासाठी आल्या आहेत  त्यांचे आपणास मार्गदर्शन मिळेलच त्याचा आपण उपयोग करून घेऊया.त्यानंतर या समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांनी समस्त माताभगिनीच्या समस्या जाणुन घेतल्या प्रस्ताव सादर करताना येणार्या अडचणी सांगितल्या त्यावर त्या म्हणाल्या  की हल्ली ची पीढी वाढदिवसाचे अतिशय स्तोम माजवतात डिजे काय लावतील पार्ट्या काय करतील पण या भागातील गॅब्रियल सारखा एक कार्यकर्ता याला अपवाद आहे तो  आणि त्याची टीम अतिशय तळमळीने या भागातील वंचित  घटकापर्यत या शासनाच्या योजना पोहोचाव्या यासाठी धडपडते हे बघुन खरच कौतुक वाटते समाजातील इतरही कार्यकर्त्यांनी याचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले व लाभार्थ्यांना सांगताना त्या म्हणाल्या की तुम्ही कागदपत्रांचं बावु करून घेऊ नका आजपर्यंत दलालकडुन या प्रस्तावाचा खुपच बावु केला गेला त्यासाठी खुपच आर्थिक झळ सोसावी लागली आहे परंतु आता हितुन पुढे असे घडणार नाही कारण गॅब्रियल सारखे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी पक्ष तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्ही जी काही नियमाने लागतील ते कागदपत्रे द्या तुमची सर्व प्रस्ताव आम्ही स्वत लक्ष घालुन पुर्ण करून देऊ कोणावरही अन्याय होऊ देणार नाही यासाठी माझ्याकडुन जी काही मदत लागेल ती सर्वतोपरी करणार  असा शब्द दिला त्यानंतर समिती सदस्य आप्पासाहेब ढोले आपल्या भाषणात म्हणतात की आमच्या अध्यक्षा ज्योती आदाटे यांनी आपणास मार्गदर्शन केलेलेच आहे त्यापद्धतीने प्रस्ताव सादर करा त्या मंजुर प्रस्तावा पेक्षा नाकारलेल्या प्रस्तावाचा जास्त विचार करतात प्रत्यक्षात त्यांच्या घरी जाऊन होम व्हीजीट करतात आणि प्रशासनाला वस्तुस्थिती समजावून सांगुन प्रस्ताव घ्यायला सांगतात तसेच आजपर्यंतच्या इतिहासात कधी घडले नाही ते आमच्या अध्यक्षा नी करून दाखवलय ते म्हणजे समितीच आपल्या दारी अगदी वारांगणा च्या दारात सुध्दा जाऊन एक आगळा वेगळा पायंडा पाडला आहे आम्हाला त्यांच्या सोबत काम करताना खुपच अभिमान वाटतोय असे ही मार्गदर्शन केले यानंतर आभार प्रदर्शन सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कुमार वायदंडे म्हणाले अशा महामारीच्या काळातसुध्दा जीवाची पर्वा न करता  अध्यक्षा ज्योती आदाटे आणि त्यांची समिती भागाभागात फिरून मेळावे घेतात प्रबोधन देतात त्याबद्दल त्यांचे आभार असेच वेगवेगळ्या भागात असे कार्यक्रम लावु आणि लाभार्थ्यांना प्रस्ताव करून देण्यास कठीबद्द राहु अशी ग्वाही दिली या  कार्यक्रमास मिरज च्या अध्यक्षा वंदना चंदनशिवे सरचिटणीस  प्रियांका तुपलोंडे विद्या कोलप परसु भोरे राजु चव्हाण सतिश घाटगे  भारत चौगुले कृपादान भोरे जीवन भोरे सोमनाथ महापुरे प्रशांत आवळे रायबा भोरे वैभव तिवडे महेश मद्रासी गणेश खैराळे स्वागत ऐवळे प्रतिक गेजगे अब्दुल शेख आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.