Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिका क्षेत्रात कचरा वर्गीकरण जनजागृती प्रतिसाद : आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रात लोक सहभागातून मोहीम यशस्वी

महापालिका क्षेत्रात कचरा वर्गीकरण जनजागृती प्रतिसाद : आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा क्षेत्रात लोक सहभागातून मोहीम यशस्वी 

आझादीका अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत बुधवारी महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्व्हेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाच्या जनजागृतीसाठी ओला सुका कचरा वर्गीकरण जनजागृती मोहिम पार पडली. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी यांच्या सह आरोग्य यंत्रणेने ही मोहीम लोकसहभागातून यशस्वी केली.

    महापालिका क्षेत्रात सकाळी 6 वाजल्यापासून प्रभाग समिती कार्यालयापासून कचरा वर्गीकरण जनजागृती मोहिमेला सुरवात झाली. याचबरोबर नागरिक वस्त्यात जाऊन नागरिकांना ओलासुका आणि घातक कचरा काय असतो आणि तो वेगळा कसा करायचा याबाबत जनजागृती करण्यात आली. याचबरोबर ओला सुका कचरा कचरा गाडीत


स्वतंत्रपणे टाकनेबाबतही सांगण्यात आले. मनपा क्षेत्रात अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे  यांच्यासह सर्व सहायक आयुक्त , वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर यांच्यासह आरोग्य यंत्रणा, स्वच्छता निरीक्षक, मुकादम आणि सामाजिक संस्था यांनी या मोहिमेत सहभागी होत ही मोहीम यशस्वी केली. विशेष म्हणजे नागरिकांनी या कचरा वर्गीकरण जनजागृती मोहिमेत सहभाग घेऊन ओला आणि सुका कचऱ्याबाबत माहिती करून घेत स्वतंत्र्यरित्या कचरा जमा करण्याबाबत ग्वाही दिली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता सर्व्हेक्षण शहर समन्वयक अधिकारी वर्षा चव्हाण, पर्यावरण अभियंता ऋषिकेश किल्लेदार, वैष्णवी कुंभार आणि टीमने अथक प्रयत्न केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.