मिरज मेडीकल कॉलेजमधून साताऱ्याला बदली झालेले डॉ यांची मिरज येथे बदली. सातारा वैद्यकीय अधिष्ठातांचे आदेश आ.सुधीरदादा गाडगीळ यांच्या मागणीला यश..
सातारा येथे नेण्यात आलेल्या मिरज शासकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि डॉक्टरांना तत्काळ पुन्हा परत पाठविण्याबाबतची मागणी आ. गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे गत महिन्यात केली होती. याबाबतचा त्यांच्याकडून पाठपुरावा सुरु होता. शासकीय,वैद्यकीय महाविद्यालय, मिरज व या महाविद्यालयास संलग्न असलेले रुग्णालय हि पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय दृष्ट्या महत्वाची संस्था आहे. महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर,रत्नागिरी, तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातून हजारो रुग्ण उपचाराकरिता येतात. परंतु महाराष्ट्र शासनाने या महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे प्रतीनियुक्तीने पदस्थापना दिली आहे. यामुळे या सर्वाना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरुपात पदस्थापना केलेल्या प्राध्यापकांना मे महिन्यापासून कार्यमुक्त करण्यात आले होते. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स या संस्थेमधून गेल्यामुळे रुग्णांची गैरसोय निर्माण झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने २०२० व २०२१ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या जागांचे प्रस्ताव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांना सादर केले आहेत. त्या अनुषंगाने सप्टेंबर २०२१ मध्ये संबधित प्रात्यक्षिक परिक्षा निरीक्षणे होणार आहेत. प्राध्यापकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. यामुळे शासकीय महाविद्यालय , मिरज यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक यांना वैद्यकीय शासकीय महाविद्यालय, सातारा येथून तत्काळ कार्यमुक्त करण्याची मागणी आ. गाडगीळ यांनी केली होती. या मागणी नंतर मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून सातारा येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आलेले ४९ प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकार्यांना सातारा शासकीय महाविद्यालयातून कार्यमुक्त करण्यात आल्याबाबतचे लेखी आदेश वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संजय गायकवाड यांनी काढले आहेत. या निर्णयामुळे मिरजेतून साताऱ्याला गेलेल्या त्या ४९ डॉक्टरांनाहि दिलासा मिळाला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.