शी जिनपिंग आजारी?
चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांची तब्येत बरी नसल्याची चर्चा जोर धरू लागली असून त्याविषयी अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गेल्या ६०० दिवसात शी जीनपिंग यांनी एकही परदेश दौरा केलेला नाही. १८ जानेवारी २०२० मध्ये म्यानमार दौरा केल्यानंतर ते देशाबाहेर पडलेले नाहीत. इतकेच नव्हे तर देशातील तसेच परदेशी नेत्यांच्या आमनेसामने भेटी ते टाळत आहेत असेही दिसून आले आहे. त्यामुळे भेटीगाठी घेण्याच्या परिस्थितीत जीनपिंग नसावेत असा तर्क वर्तविला जात आहे.
युएस टुडेच्या रिपोर्टनुसार जीनपिंग कुणालाही वैयक्तिकरित्या भेटत नाहीयेत. चीन दौऱ्यावर आलेले परदेशी नेते अथवा परराष्ट्र सचिवाचे दौरे बीजिंग सोडून होत आहेत आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यीच त्यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. मार्च २०१९मध्ये इटली, मोनॅको आणि फ्रांस दौऱ्यात गार्ड ऑफ ऑनर घेताना शी जीनपिंग लडखडले होते आणि फ्रान्सच्या पंतप्रधानांशी चर्चा करताना खुर्चीच्या आधाराने उठले होते. तेव्हापासून ते आजारी असावेत असा तर्क होता.
रशियाचे पुतीन, जर्मनीच्या अन्जेला, फ्रांसचे मॅक्रो अश्या ६० राष्ट्रप्रमुखांशी जीनपिंग यांनी फोनवरूनच संवाद साधला आहे. ब्रीक्सच्या ९ सप्टेंबरच्या बैठकीला त्यांनी व्हर्च्युअल उपस्थिती लावली होती. शेंझेन येथील इकॉनॉमिक झोन ४० व्या वर्षापन दिनाच्या कार्यक्रमाला ते उशिरा पोहोचले आणि भाषण करताना वारंवार खोकत होते असेही लक्षात आले आहे.शिवाय अमेरिकी परराष्ट्र मंत्री, सिंगापूर आणि डॅनिश पंतप्रधानांच्या बरोबरच्या बैठका त्यांनी कोणतेही ठोस कारण न देता स्थगित केल्या आहेत असेही सांगितले जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.