अरिन हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. दिपाली जाधव राज्यपालांच्या हस्ते सन्मानित
माधवनगर: कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये मिरज येथील अरिन हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ. दिपाली जाधव व सहकार्यांंनी केलेली रुग्णसेवा आणि जनजागृती कार्याची दखल घेऊन राज्यपाल महामहिम भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे डॉ. जाधव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे मुंबई ड्रीम्स समाज कल्याण पुरस्कार 2021 प्रदान करण्यात आले. मुंबई ड्रीम्स प्रकाशन संस्था व सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास संस्थेचे रुद्रप्रताप बिस्वास, सह्याद्री फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले प्रामुख्याने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.