Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापालिकेच्या ठोक मानधन तत्वावरील कर्मचारी भरतीवेळची प्रतिक्षा यादी रद्द : उपायुक्त राहुल रोकडे यांची माहिती

महापालिकेच्या ठोक मानधन तत्वावरील कर्मचारी भरतीवेळची प्रतिक्षा यादी रद्द  : उपायुक्त राहुल रोकडे यांची माहिती


सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ठोक मानधन तत्वावरिल पाणीपुरवठा मजुर, वाहनचालक व आरोग्य विभागाकडील साफसफाई

कर्मचारी भरतीवेळी केलेल्या प्रतिक्षा यादी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मान्यतेने रद्द करण्यात आल्याची माहिती उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिली.

यामध्ये पाणीपुरवठा मजुर - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडे ठोक मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात पाणीपुरवठा विभागाकडे ४० पाणीपुरवठा मजुर मानधन तत्वावर घेणे कामीची जाहिरात दैनिक केसरीच्या वृत्तपत्रात दिनांक 6/12/2019 ने प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार रितसर मुलाखती घेऊन निवड यादी व प्रतिक्षा यादी दिनांक 12/5/2020 रोजीने प्रसिष्द करण्यात आली होती. त्यानुसार यादीप्रमाणे पाणीपुरवठा मजुराची नियुक्ती करण्यात आली आहे.

याचबरोबर आरोग्य विभागाकडे ४८ वाहनचालक ठोक मानधन तत्वावर घेणेकामीची जाहिरात दैनिक सकाळच्या वृत्तपत्रात दिनांक 31/10/2019 रोजीने प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार रितसर मुलाखती घेऊन निवड यादी व प्रतिक्षा यादी

दिनांक 19/11/2019 रोजीने प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार यादीप्रमाणे आरोग्य विभागाकडे वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 आरोग्य विभागाकडे १५ साफसफाई कर्मचारी ठोक मानधन तत्वावर घेणेकामीची जाहिरात दैनिक पुढारी व दैनिक सकाळच्या वृत्तपत्रात दिनांक 27/11/2019 रोजीने प्रसिध्द करण्यात आली होती. त्यानुसार रितसर मुलाखती घेऊन निवड यादी व प्रतिक्षा यादी दिनांक 10/1/2020 रोजीने प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार यादीप्रमाणे आरोग्यविभागाकडे कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार रितसर नियुक्त केलेले कर्मचारी सद्यस्थितीमध्ये कार्यरत आहेत. सदर निवड प्रक्रियेवेळी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रतिक्षा यादीचा कालावधी १ वर्षापेक्षा जादा झाला असल्याने सदरची प्रतिक्षा  यादी रद्द करण्यात येत आहे. येथून पुढे या प्रतिक्षा यादीमधील कोणत्याही उमेदवारांची नियुक्ती केली जाणार नाही. यांची उमेदवार व इतर सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहनही उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.