Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच भारतीय तालिबानी

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच भारतीय तालिबानी


पाटना : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या वाकयुद्ध रंगताना दिसत आहे. रासद नेते वारंवार मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहे. त्यातच आता राष्ट्रीय जनता दलाचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जगदानंद सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना थेट तालिबान्यांसोबत केली आहे.

तालिबानी अफगाणिस्तानमध्ये जे काम करतात, तेच काम भारतात संघ करत आहे. तालिबान हे नाव नसून एक संस्कृती आहे. जी अफगाणिस्तानात आहे. दोन्ही एकच गोष्टी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील तालिबान असून ते बांगड्या विकणाऱ्यांना, पंक्चर काढणाऱ्यांना मारहाण करत असतात. आपण यांना थांबवायला पाहिजे, असं सिंह यांनी म्हटलं आहे. सिंह यांनी तालिबान आणि संघ यांच्यातील फरक समजून सांगताना अशी तुलना केली आहे.

जगदानंद यांच्या वक्तव्यानंतर भाजप आणि राजद यांच्या नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. जो व्यक्ती ज्या समाजात राहतो, तो तसा विचार करतो. सिंह यांच्या वक्तव्याचा भाजपने खरपूस समाचार घेतला आहे. तसेच राजद ज्या संस्कृतीचा भाग आहे, त्यानुसार जगदानंद वक्तव्य करत आहेत, असं भाजप प्रवक्ते अरविंद सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी याआधी भाजपपेक्षा घातक पक्ष कोणताच नाही, यांच्यापासून सावध रहा, अशी भाजपवर टीका केली होती. त्यानंतर आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.