नराधम बापाचा पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
पिंपरी : जन्मदात्या पित्यानेच पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असलेल्या या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली. थेरगाव येथे बुधवारी (दि. 1) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित 14 वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी शुक्रवारी (दि. 3) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून 40 वर्षीय नराधमाला पोलिसांनी अटक केली. फिर्यादी महिला आणि आरोपी हे पती-पत्नी तर 14 वर्षीय पीडिता त्यांची मुलगी आहे.
फिर्यादी महिला घरी नसताना आरोपी मुलीसोबत गैरवर्तन करीत असे. आरोपीने बुधवारी दुपारी एकच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केले. याबाबत मुलीने तिच्या आईला सांगितले. त्यानंतर तिच्या आईने पोलिसांकडे धाव घेत तक्रार केली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी लुटमार करून जबरी चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.