Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बाळाचं नाव ऐकूनच सरकारला फुटला घाम; बदलण्याचे दिले आदेश, काय आहे प्रकरण?

 बाळाचं नाव ऐकूनच सरकारला फुटला घाम; बदलण्याचे दिले आदेश, काय आहे प्रकरण?


नवी दिल्ली : प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी आपल्या एका नाटकात म्हटलं होतं, की – “नावात काय आहे? आपण गुलाबाला इतर कोणत्याही नावाने पुकारले तरी त्याचा सुगंध कधीही कमी होणार नाही. पण स्वीडिश सरकार  शेक्सपिअरच्या या मताशी सहमत नसल्याचं नुकतंच दिसलं आहे. नुकतंच, एका स्वीडिश जोडप्याने आपल्या मुलाचे नाव  जगातील एका मोठ्या राजकारण्याच्या नावावर ठेवले. स्वीडिश सरकारच्या विभागाला याची माहिती होताच, ते इतके घाबरले की त्यांनी ते नाव ठेवण्यास बंदी घातली आणि जोडप्याला लगेच नाव बदलण्याचे आदेश दिले.

हे प्रकरण स्वीडनच्या लाहोल्म शहरातील आहे. येथील सार्वजनिक प्रसारक, एसआर यांनी याबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं, की अलीकडेच एका जोडप्यानं आपल्या बाळाचे नाव रशियाचे अध्यक्ष  व्लादिमीर पुतीन  यांच्या नावावर ठेवले. पण सरकारला याची माहिती होताच त्यांनी या जोडप्याला नाव बदलण्यास सांगितले. खरं तर, स्वीडनमध्ये एक नियम आहे की मुलाच्या जन्माच्या 3 महिन्यांच्या आत पालकांनी आपल्या मुलाचे नाव सरकारी विभागाला सांगावे जेणेकरून ते हे नाव मंजूर करू शकतील. स्वीडिश एजन्सी Skatteverket नं बाळाचं नाव पाहताच ते बदल्याचे आदेश दिले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.