Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

या तीन बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज

 या तीन बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज


मुंबई: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये बँकेतील मुदत ठेव योजनांचा  पर्याय नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. तुलनेत कमी जोखमीची आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिले जाते. त्यामुळे आजही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असूनही सामान्य गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात. 

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही अवघ्या सात दिवसांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक करु शकता. गेल्या काही काळात अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्यामुळे बँकांनी मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी केला आहे. त्यामुळे ग्राहक सातत्याने फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याज मिळवून देणाऱ्या योजनांच्या शोधात असतात.

यापूर्वी भारतीय स्टेट बँक (SBI), HDFC बँक आणि आयसीआयसीआय बँकेत मुदत ठेवीवर चांगले व्याज मिळत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये या बँकांकडून मुदत ठेवीवरील व्याजदर घटवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांनी आपला मोर्चा स्मॉल फायनान्स बँकाकडे वळवला आहे. या बँकांकडून मुदत ठेवीसाठी 6.75 ते 7 टक्क्यांच्या घरात व्याज दिले जात आहे.


सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून सात ते दहा दिवसांच्या मुदत ठेव योजनेसाठी 3.25 टक्के ते 6.75 टक्के इतके व्याज दिले जात आहे.

नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँक 

नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बँकेकडून सात ते दहा दिवसांच्या मुदत ठेव योजनेसाठी 3 ते 7 टक्के इतके व्याज दिले जात आहे.

जन स्मॉल फायनान्स बँक 

जन स्मॉल फायनान्स बँकेकडून मुदत ठेव योजनांसाठी 2.5 टक्के ते 6.75 टक्के इतके व्याज दिले जात आहे. उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेतील  व्याजदर 3 टक्के ते 6.75 टक्के इतका आहे.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना व्याजदर हाच एकमेव निकष ठेवू नका. जास्त व्याजाच्या हव्यासापोटी कोणतीही पतपेढी किंवा लहानसहान बँकेत पैसे गुंतवू नका. त्यासाठी चांगले रेटिंग असलेल्या पतपेढी आणि बँकांची निवड करा.

मुदत ठेव योजनांमध्ये पैसे किती कालावधीसाठी गुंतवायचे हे आपल्या गरजेनुसार आणि सोईनुसार ठरवा. तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि पुढील पाच-दहा वर्षे या पैशांची फारशी गरज लागणार नाही, असे वाटत असल्यास पैसे FD मध्ये गुंतवा. एक किंवा दोन वर्षांच्या तुलनेत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास FD वर जास्त व्याज मिळते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.