Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धरणग्रस्त, शिवसेनेची पवना धरणावर निदर्शने

 धरणग्रस्त, शिवसेनेची पवना धरणावर निदर्शने


पवनानगर : मावळ तालुका आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांची तहान भागविणारे मावळ तालुक्‍यातील पवना धरण काठोकाठ भरले. धरण फुल्ल भरल्यानंतर कधी नव्हे ते यंदा जलपूजनाचा मुद्दा कळीचा ठरला. खासदार श्रीरंग बारणे यांनी जलपूजन केले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनीही जलपूजनाचे शनिवारी (दि. 4) नियोजन केले;

मात्र धरणग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत जलपूजन नाही, या भूमिकेशी धरणग्रस्त शेतकरी ठाम राहिले. त्यानंतर शिवसेनाही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ मिळाले.

धरणग्रस्तांनी दोन दिवसापूर्वीच कोणत्याही लोकप्रतिनिधींनी जलपूजनासाठी येऊ नये असे पत्रक काढले होते. जर जलपूजनाला यायचे असेल तर आधी पुनर्वसनासह रखडलेले प्रश्‍न मार्गी लावा. आणि मगच जलपूजनाचा कार्यक्रम घ्या, अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली होती. तसेच शिवसेनचे खासदार श्रीरंग बारणे यांनी 30 ऑगस्ट रोजी जलपूजन केले होते. त्यांनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृह नेते नामदेव ढाके यांनी खासदारांवर टीका करण्यात आली.

 

त्यानंतर मावळ शिवसेनेने याला विरोध करत आक्रमक भूमिका घेतली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर ढोरे या शनिवारी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर धरणग्रस्त व शिवसैनिक सकाळी सात वाजल्यापासूनच पवना धरणाच्या गेटवर ठिय्या देऊन बसले होते. मात्र महापौरांनी दौरा रद्द केला असल्याचे समजले. त्यानंतर शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी करीत महापौरांच्या जलपूजनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर पवनानगर चौकात शिवसेनेच्या वतीने घोषणाबाजी निषेध व्यक्‍त करुन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या वेळी जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, देहुरोड शहर प्रमुख भरत नायडू, तळेगाव शहर प्रमुख दत्ता भेगडे, उपतालुका प्रमुख मदन शेडगे, अमित कुंभार, विभाग प्रमुख राम सामंत, सुरेश गायकवाड, किसन तरस, उपविभाग प्रमुख आकाश वाळुंज, कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले, शहर प्रमुख सुरेश गुप्ता, शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष अनिता गोणते, छाया कालेकर, सुनंदा आवळे, सुरेखा मोरे, पवनमावळ संघटक ज्योती सावंत, सुरेखा केदारी, धरणग्रस्त रवीकांत रसाळ, मुकूंद काऊर, सीताबाई डोंगरे आदी शिवसैनिक व धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

आश्‍वासनाशिवाय महापलिकेकडे काहीच मिळाले नाही. जलपूजन करणे हीच फॅशन सुरू केली आहे. महापालिकेने गाळे देऊ, नोकऱ्या देऊ, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ या सर्व आश्‍वासनांचा विसर महापालिकेला पडला आहे.

पवना धरणावर महापौर ढोरे जलपूजन करण्यासाठी येणार होते. याला शिवसेना आणि धरणग्रस्तांच्या वतीने विरोध करण्यात आला. खासदार बारणे यांच्यावर टीका केली. धरणग्रस्तांची प्रतारणा केली. आजचा कार्यक्रम सकाळी लवकर ठेवला; परंतु ऐनवेळी रद्द करण्याची वेळ महापौरांवर आली आहे. खासदार बारणे यांनी पवनेतील गाळ काढून पाणी क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे. सभागृह नेते नामदेव ढाके आणि खोटी आश्‍वासने देणाऱ्या भाजपाचा निषेध करतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.