ई-पीक पाहणी ॲप शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यास महत्वपुर्ण कामगिरी करेल - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
- देवराष्ट्रे येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारकाची केली पाहणी
सांगली, दि . 2, : नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पीकांची तातडने भरपाई व्हावी, त्याचबरोबर पीककर्ज, पीक विमा व इतर योजनांचा लाभ शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी ई-पीक पाहणी ॲप महत्वपूर्ण कामगिरी करेल, त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. त्याबरोबर हे ॲप वापरण्यासाठी स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज केले.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, कुंभारवाडी व पलूस तालुक्यातील कुंडल येथे ई-पीक पाहणी ॲप द्वारे लावण्या येणाऱ्या पीक पाहणी कामाची प्रत्येक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसिलदार शैलजा पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव व शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पीक पेरणीची माहिती मोबाईलवर ॲपव्दांरे गाव नमूना 12 मध्येभ नोंदविणेसाठी स्वधतः शेतक-यांनी उपलब्धल करुन देण्यागचा ई-पीक पहाणी कार्यक्रम संपूर्ण राज्याात राबविण्यााचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता मोबाईल ॲपव्दावरे शेतकऱ्यांना त्यांईच्याव शेतातील पीकाची माहिती त्यांच्या बांधावरुनच नोंदविता येणार आहे. ई-पीक पहाणी ॲप मुळे शेतक-यांकडून वस्तूयस्थितीदर्शक व सत्यतस्थितीदर्शक ( Real Time Crop Data ) माहिती उपलब्धी होणार असून या माहितीच्याळ आधारे पीक विमा व इतर शासकीय योजनांसाठी शेतक-यांना फायदा होणार आहे. तसेच या ई-पीक पहाणी व्दाेरे आलेली पीकांची माहिती ही शासकीय विभागास योजना अंमलबजाणीसाठी होणार आहे. ई-पीक पहाणी प्रकल्पााचा उद्देश शेतक-यांना सक्षम करणे असून त्याभमुळे शेतकरी स्वीतः आपल्या पीकाची माहिती फोटो व्दासरे नोंदविणार असल्याने वस्तूास्थितीदर्शक माहिती उपलब्ध् होणार आहे.
देवराष्ट्रे येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारकाची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे येथील जन्मस्थळ असलेल्या स्मारकाची जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पाहणी केली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाच्या सुधारणेसाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.