लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी,ओम गणेश सार्वजनिक गणपती ट्रस्ट, भारतीय जनता पार्टी, वैद्यकीय आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चांदणी चौक येथे भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर
सांगली दि.22/09/2021 लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी,ओम गणेश सार्वजनिक गणपती ट्रस्ट, भारतीय जनता पार्टी, वैद्यकीय आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चांदणी चौक येथे भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर अतिशय थाटामाटात संपन्न झाले. प्रारंभी दीपप्रज्वलनाने शिबिराची सुरुवात झाली. स्वागत ट्रस्टचे अध्यक्ष नगरसेवक लक्ष्मण भाऊ नवलाई यांनी केले. लोकमान्य चे रिजनल ऑफिसर मा.सुदत्त पाठक साहेब यांनी प्रास्ताविकामध्ये लोकमान्य सोसायटी विषयी स्थापनेपासून उत्तरोत्तर कशी वाढ झाली याबाबत सविस्तर माहिती दिली.संस्थेच्या सहा हजार कोटी ठेवी असून संस्था सुविधेसह रियल इस्टेट, पर्यटन, आदरातिथ्य, विमा सेवा,शिक्षण,आरोग्य, हेलिकॅप्टर सेवा अशा अत्याधुनिक सेवेच्या माध्यमातून आज संपूर्ण देशभरामध्ये ग्राहकांना चांगले व्याजदर देऊन अविरतपणे सेवा करीत आहोत. तसेच संस्था सामाजिक बांधिलकी म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम,आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यामध्ये आत्मीयतेने लक्ष घालत असतात. ओम गणेश ट्रस्टने हाती घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे. समारंभाचे प्रमुख अतिथी भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष मा.दीपक बाबा शिंदे यांनी घेतलेल्या शिबीराचे मनभरून कौतुक केले व सध्या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रांमध्ये देशाचा विकास झपाट्याने होत असल्यामुळे आज देशातले उद्योजक, व्यापारी,शेतकरी सर्वसामान्य नागरिक समाधानी आहेत. दीपक बाबांनी देखील रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकीची जपणूक केलेली आहे असे गौरवोद्गार काढले.यावेळी तरुण भारतचे संपादक मंगेश जी मंत्री यांनी लोकमान्य सोसायटी यांच्या कार्याचा आढावा देऊन समाधान व्यक्त केले व ज्येष्ठ उद्योजक मनोहर काकाजी सारडा यांनी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी व ओम गणेश ट्रस्ट व भारतीय जनता पार्टी यांनी घेतलेले कार्यक्रमाचे कौतुक केले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सेवासदन लाइफ लाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या वतीने ईसीजी व ब्लड प्रेशर तपासणी करण्यात आली. अनुराधा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यावतीने डोळ्यांची विविध तपासणी करण्यात आली. कुमार डेंटल क्लिनिक यांच्यावतीने दंत तपासणी करण्यात आली. मनपातर्फे मोफत लसीकरण करण्यात आले. सिद्धिविनायक ब्लड बँक व शिरगावकर ब्लड बँक यांचेमार्फत रक्तदान शिबीर घेण्यात आले. साधारणतः साडेतीनशे नागरिक या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. यावेळी सांगलीच्या पहिल्या महापौर सौ.शैलजाताई नवलाई, तरुण भारतचे संपादक मा.मंगेश जी मंत्री, डॉ.भालचंद्र साठे, डॉ. पंकज म्हेत्रे, डॉक्टर भरत शहा, मनपाच्या डॉक्टर अलका तोडकर,अशा वर्कर,उद्योजक अशोक आन्ना पाटील, उद्योजक जयपाल चिंचवाडे, जनता मेडिकल चे शीतल नाथ पाटील, उद्योजक रमाकांत घोडके,नगरसेविका स्वाती ताई शिंदे, आर. बी. पाटील, उद्योजक कल्लाप्पा आण्णा सुतार, अरुण गतारे, अविनाश मोहिते, माधुरी वसगडेकर तसेच लोकमान्य चे प्रदीप पाटील,सुभाष मोरे, पंडित पाटील व पूर्ण स्टाफ उपस्थित होता. यावेळी ट्रस्टचे भीमसेन नवलाई, प्रकाश जाधव, बबन मंडलिक, राहुल नवलाई, सुनील चव्हाण,प्रकाश चव्हाण, प्रकाश नवलाई, प्रथमेश फोटो, बसवराज पाटील,आशुतोष कडलास्कर, गणेश शिंदे अन्य महिला व पुरुष उपस्थित होते सदर कार्यक्रमाबाबत सर्व नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.