शंभरावर मुलींना काढून दिले सुकन्या योजनेचे खाते अजिंक्यन अँड वूमन फाउंडेशनचा उपक्रम
सांगली ०४ सप्टेंबर : अजिंक्यन अँड वूमन फाउंडेशनतर्फे शंभरहून अधिक मुलींना सुकन्या योजनेअंतर्गत बँक खाती काढून पासबुक देण्यात आली. त्याचे पासबुक वितरण कार्यक्रम शनिवारी पार पडला. मंजिरी गाडगीळ यांच्याहस्ते मुलींना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी गाडगीळ म्हणाल्या की, अजिंक्यन वूमन फाउंडेशन महिलांसाठी सुरू केलेले एक व्यासपीठ आहे. त्यामध्ये महिला सबलीकरणासाठी काम केले जाते. फाउंडेशन अंतर्गत ऐशानी अथेंटिक्स म्हणून एक युनिट सुरू केले आहे. त्याच्या माध्यमातून बास्केट क्वीन म्हणून ॲप सुरू केले आहे. त्यातून महिलांनी बनवलेले सर्व ताजे पदार्थ घरोघरी पोहचविले जातात आणि या महिलांना उद्योग निर्माण करून देण्यात येते. बास्केट क्वीन हे वोकल फॉर लोकल सिस्टिमवर चालते. सांगलीतील सर्व दुकाने यात समाविष्ट केली आहेत.
कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगीळ यांनी कार्यक्रमास व प्रकल्पास सहकार्य केल्याचेही मंजीरी गाडगीळ यांनी सांगितले. यावेळी रीटा शहा, वर्षा पोळ, निर्मला शेलार, स्वाती देवल, स्वाती भिडे, विद्या खिलारे, कल्याणी गाडगीळ, मिरज इनरव्हील क्लबच्या सौ. सारिका प्राणी, केतकी जोशी, डॉ. गीता कदम आदी उपस्थित होते. स्वागत रीटा शहा व आभार कल्याणी गाडगीळ यांनी मानले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.