Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सामान्य नागरिक म्हणून रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना मारहाण

 सामान्य नागरिक म्हणून रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना मारहाण

नवी दिल्ली : करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशातील आरोग्य व्यवस्थेच्या कारभाराचे वाभाडे निघाले. अनेकांना ऑक्सिजन अभावी जीव गमवावा लागला. तर अनेक ठिकाणी रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील समोर आला. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री मनसुख मांडविया सफदरगंज रुग्णालयात सामान्य नागरिक म्हणून तपासणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयातील एका गार्डने काठीने मारहाण केली. सफदरगंज रुग्णालयातील आरोग्यविषयक उपक्रमांच्या उद्घाटन समारंभात मांडविया यांनी हा खुलासा केला आहे.

डॉ. मांडाविया म्हणाले की, रुग्णालयात एक सामान्य रुग्ण म्हणून तपासणी करण्यासाठी गेला त्यावेळी बाकावर बसत असताना गार्डने बाकावर बसू नको असे म्हणत, शिव्या दिल्या आणि काठीने मारहाण केली. त्याचवेळी रुग्णालयात एक वयस्कर महिला आपल्या मुलासाठी स्ट्रेचर मिळवण्यासाठी एका गार्डकडे विनवणी करत होती, पण महिलेला स्ट्रेचर दिले नाही.

दरम्यान याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. त्यावर मोदींना देखील धक्का बसल्याचं मांडविया यांनी सांगितलं. तसेच मोदींनी गार्डला निलंबित केलं, का असं विचारलं. त्यावर आपण एका गार्डला निलंबित न करता संपूर्ण सिस्टममध्ये सुधारणा करायची असल्याचं मांडविया यांनी सांगितलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.