कर्मवीर पतसंस्था, सांगली व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट सांगली वतीने १० संस्थांना मदतीचा चेक प्रदान, रक्तदान शिबीर व नेत्रतपासणी शिबीर घेऊन कर्मवीर जयंती साजरी
कर्मवीर आण्णांची जयंती हा समाजोत्सव व्हावा. श्री रावसाहेब पाटील सांगली : येथील कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट, सांगली यांच्या वतीने कर्मवीर आण्णांची १३४ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमानी साजरी करण्यात आली. जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील होते.
यावेळी समाजासाठी काम करणाऱ्याा १० संस्थांना त्यांच्या कार्यासाठी प्रत्येकी रु.२१०००/- च्या मदतीचा धनादेश प्रदान करणेत आले. त्यामध्ये १) मुकबधीर शाळा सांगली २) कर्मवीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल कर्मवीर आरोग्य अभियान ३) अंकुर बालमंदिर तुंग ४) जिल्हा परिषद शाळा ब्रम्हनाळ ५) इन्साफ फौडेशन सांगली ६) कर्मवीर भाऊराव पाटील फौंडेशन कुंभोज ७) बेलनकर अनाथ बालकाश्रम सांगली ८) वृध्दसेवाश्रम कुपवाड ९) सन्मान शिक्षण संस्था सुखवाडी १०) चाईल्ड राईट्स अॅण्ड यु. मुंबई असा एकून रु. २ लाख १ हजाराचा निधी या संस्थांना देण्यात आला
कर्मवीर आण्णांच्या विचाराचा वसा घेऊन कर्मवीर पतसंस्था आणि कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट या संस्था कार्य करीत आहेत. समाजोपयोगी कार्याच्या पाठीसी संस्था सदैव उभी राहील याची ग्वाही श्री. रावसाहेब पाटील यांनी दिली कर्मवीर आण्णांनी शिक्षणाचे महत्व ओळखून शिक्षणाची द्वारे सामान्यासाठी खुली केल्यामुळेच महाराष्ट्र हा सर्वच बाबतीत प्रगतीपथावर आहे. त्याचे श्रेय आण्णांच्या दुरदर्शी विचाराना जाते असे श्री. रावसाहेब पाटील म्हणाले.
यावेळी शिरगावकर ब्लड बँकेच्या मदतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ११ रक्तदात्यानी रक्तदान केले. तसेच कुल्लोळी नेत्र रुग्णालयाच्या मदतीने नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्याचा नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या प्रसंगी ज्या संस्थांना देणगी दिली त्या सर्वच संस्थाच्या पदाधिकारी यांनी या देणगी दिल्या बद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले व संस्थेच्या कार्याचे कौतुक करून संस्थेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे संस्थेचे संचालक ब कर्मवीर चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री. ओ.के. चौगुले ( नाना) संचालक व ट्रस्ट कार्यवाह लालासाहेब भाऊसाहेब थोटे संचालक अॅड. एस. पी मगदूम, डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, डॉ. रमेश वसंतराव ढवू, वज्ञ संचालक डॉ. एस. बी. पाटील (मोटके ) ट्रस्टी डॉ. अशोक आण्णा सकळे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदूम कर्मवीर आरोग्य अभियानाचे सेक्रेटरी डॉ. बरगाले शिरगांवकर ब्लड बँकेचे श्री. उज्जल तिळवे नेत्र रुग्नालयाचे कमर शेख हजर होते आभार संचालक श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले यांनी मानले. सूत्र संचलन संजय सासणे यांनी केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.