बेकायदेशिर सावकारीच्या अनुषंगाने शैलेश धुमाळ व त्याचा मुलगा आशिष धुमाळ यांच्या म्हैशाळ व सांगली येथील घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे छापे
सांगली येथील घरावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे छापे " मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सावकारीच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारीबाबत शहनिशा करून अशा तक्रारीवर दखल घेऊन बेकायदेशिर सावकारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिलेले आहेत.
सावकारी सेलकडे आलेल्या तक्रारीमध्ये अशोक कोरवी रा. म्हैशाळ यांना ऑगस्ट २०१८ मध्ये रु. ३० लाख चा चेक देऊन त्या बदल्यात मासिक ७ टक्के व्याज दराने रु.२,१०,०००/- व्याजाची मागणी करुन त्यामध्ये स्थानिक कर्जदार म्हणून त्याच्याकडून रु. २ लाख मासिक व्याज घेऊन एकुण १८ महिने व्याज स्विकारले. याशिवाय चेकद्वारे रु. २५ लाख घेतल्यानंतर याबाबत एकुण रु. ६१ लाख प्राप्त झाल्यानंतर देखील अद्याप ही रु. ५० लाख येणे बाकी आहे. याबाबत मोबाईलवरुन वारंवार धमकी दमदाटी देऊन फिर्यादीचा म्हेशाळ हद्दीतील १३ गुंठ्याचा प्लॉट नावावर करण्यासाठी तगादा लावल्याने फिर्यादी यांनी याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार केल्याने याप्रकरणी बेकायदेशिर सावकारांबाबत तात्काळ कठोर पावले उचलून तक्रारदार याची तक्रार दि. ०४.०९.२०२१ रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली. याप्रकरणी खंडणी मागणे व बेकायदेशिर सावकारी करणे याबाबतची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
उपरोक्त प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स. पो. नि. निरज उबाळे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील पो. उ. नि. आर. एफ. मिरजे यांची दोन पथके याकामी नियुक्त केल्यानंतर गुन्ह्याती सावकार शैलेश रामचंद्र धुमाळ रा. सांगली व त्याचा मुलगा आशिष शैलेश धुमाळ रा. म्हैशाळ या दोघांच्या घरावर पहाटे छापा घालून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तसेच याप्रकरणामध्ये शैलेश धुमाळ यांचे घरावर छापा घातल्यानंतर त्यामध्ये रोख रु. २,३६,०००/- रक्कम, काही कोरे चेक तसेच फोर्ड कंपनीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे. याशिवाय म्हैशाळ येथे आशिष धुमाळ याचे राहते घरी यातील फिर्यादीचा घेतलेला एस. बी. आय. बँकेचा चेक, कोरे चेक ज्यावर केवळ स्वाक्षरी आहे. तसेच काही बॉन्ड ज्यावर केवळ स्वाक्षरी असून ते कोरे बॉन्ड आहेत, ते जप्त करण्यात आलेले आहेत. आशिष याचे म्हैशाळ येथील हॉटेल मनिषा एक्सीक्युटीव्ह याची देखील झडती घेण्यात आली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आ आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.