सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार उत्तम जिन्नाप्पा मोहिते टोळीस मा. पोलीस अधीक्षक, दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्हयातुन १ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.
सांगली शहर, मिरज शहर, एम. आय.डी.सी कुपवाड तसेच विश्रामबाग पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपारी टोळी प्रमुख १) उत्तम जिन्नाप्पा मोहिते, वय ३६ वर्षे, रा. गारपीर चौक, सांगली व टोळी सदस्य २) ज्योती उत्तम मोहिते, वय २९, रा. गारपीर चौक, सांगली ३) वनिता वसंत कांबळे, वय ३६, रा. वाल्मीकी आवास, सागंली या टोळीविरुद्ध सन २०१० ते २०२१ मध्ये अपहरण करणे, बलात्कार करणे, मारहाण करणे, सरकारी कर्मचा-यास सरकारी काम करण्यापासुन रोखण्यासाठी त्याचेवर हमला करणे, खोटा पुरावा देण्यासाठी धमकी देणे किंवा प्रवृत्त करणे, इच्छापुर्वक जबर दुखापत पोहचवणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा करणे असे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. नमुद सामनेवाले हे कायदा न जुमाननारे आहेत. त्यामुळे या टोळी विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस निरीक्षक, सांगली शहर पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, जत विभाग जत यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच त्यांच्या हालचाली, प्रस्तावाची सुनावणीदरम्यान टोळी प्रमुख याचेवर दाखल गुन्हा या बाबी विचारात घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन १) उत्तम जिन्नाप्पा मोहिते, वय - ३६ वर्षे, रा. गारपीर चौक, सांगली व टोळी सदस्य २) ज्योती उत्तम मोहिते, वय २९, रा. गारपीर चौक, सांगली ३) वनिता वसंत कांबळे, वय - ३६, रा. वाल्मीकी आवास, सागंली, यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली जिल्हयातुन १ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक श्री. दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, स्था.गु.अ.शाखा सांगली, पोनि अजय सिंदकर, सपोनि निलेश बागाव, सांगली शहर पो. ठाणे, सपोफो/सिध्दाप्पा रुपनर, पोकॉ/दिपक गट्टे स्था.गु.अ.शाखा सांगली, पोहेकॉ/शिवलिंग मगदुम, पोना/विजय कारंडे, सांगली पो. ठाणे यांनी भाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.