रोहित दाभाडे यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श नर्सिंग आॅफीसर / अधिपरिचारीका पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला
महाराष्ट्र स्टेट प्रायव्हेट नर्सेस युनियन चे कोल्हापूर जिल्हा संघटक व युनियनचे बाईंडर मेंबर या. रोहित दाभाडे यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श नर्सिंग आॅफीसर / अधिपरिचारीका पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला, ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत होते , यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे , हा पुरस्कार सर्व नर्सिंग प्रोफेशनचा सन्मान आहे , ते युनियन चे जिल्हा संघटक म्हणून गेली दोन वर्षे कार्यरत आहेत, या वेळी नर्सेस घ्या कार्याची दखल घेवून हा सन्मान सोहळा करण्यात आला , असा प्रसंग पहिल्यांदा अनुभवल्याने नर्सिंग प्रोफेशनल बाबत आदर व्यक्त केला जात आहे व त्यांनी कोरोना काळात स्वतःचा व कुटुंबातील सदस्य यांच्या जिवावर उदार होवून केलेल्या कार्याची दखल घेतली, या कार्यक्रमाला उपस्थित जि. प. अध्यक्ष राहूल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण सर , विविध विभागांचे सभापती , जि. प. सदस्य, पं.स. सदस्य, आरोग्य विभागाचे अधिकारी, नर्सेस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.