बार्टी संस्थेच्या महासंचालक पदी श्री. धम्मज्योती गजभिये, पुन्हा रुजू
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे संस्थेच्या महासंचालक पदी श्री. धम्मज्योती गजभिये, हे सोमवार दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी रुजू झाले आहेत. श्री. धम्मज्योती गजभिये, हे दिनांक 27 ऑगस्ट 2021 रोजी वैद्यकीय रजेवर गेल्यामुळे श्री. दि.रा. डिंगळे, सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी प्रभारी महासंचालक बार्टी, पुणे या पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक, (बार्टी), पुणे यांनी सोमवार दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी बार्टी मुख्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्प अर्पण करून अभिवादन करुन महासंचालक बार्टी, पुणे या पदाचा नियमित कार्यभार स्विकारला. यावेळी बार्टी, संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी ,पुणे यांनी बार्टी संस्थेतील विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली . या बैठकीत त्यांनी येरवडा येथे UPSC निवासी प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करावे, जिल्हास्तरावर सामाजिक न्याय भवनात बार्टी मार्फत प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कार्य अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी ऑनलाईन सॉफ्टवेअर मध्ये सुयोग्य बदल करण्यात यावे तसेच लाकडाऊन काळात UPSC / MPSC चे ऑनलाईन प्रशिक्षण नियमीतपणे सुरू ठेवण्यात यावे अशा सुचना दिल्या. सर्व जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर असलेला दस्तऐवज डिजीटाईज्ड करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, त्याचप्रमाणे E -office प्रक्रियेद्वारे पारदर्शकपणे कार्यालयीन कामकाज सुरू करावे. पासपोर्ट च्या धर्तीवर जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया राबविण्याचे धोरण सुरू करण्यात यावे, दहावीत 90 टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या गुणवंत गरजू गरिब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बार्टी मार्फत अनुदान योजना सुरू करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी त्वरित करावी. स्वयंसहायता युवा गट (SSYG) अनुसूचित जाती प्रवर्गाच्या व्यक्तींमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 50 हजार इतके स्वयं सहाय्यता युवा गट स्थापन करण्यात येत आहेत. याबाबत अंमलबजावणी त्वरीत करावी असे निर्देश दिले. यावेळी मा. महासंचालक यांनी सर्व उपक्रम योजनांचा आढावा घेतला. तसेच प्रस्तावित सर्व प्रकल्प आणि योजनांची अंमलबजावणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी, पुणे यांनी या आढावा बैठकीत दिले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.