Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव महानगरपालिकेकडून शुक्रवारी मिरजेत सत्कार , सांस्कृतिक , प्रबोधनात्मक कार्यक्रम, प्रदर्शनाचे आयोजन

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव महानगरपालिकेकडून शुक्रवारी मिरजेत सत्कार , सांस्कृतिक , प्रबोधनात्मक कार्यक्रम, प्रदर्शनाचे आयोजन 


सांगली: भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत सांगली मिरज ,कुपवाड शहर महानगरपालिकेकडून शुक्रवार दि. 1 आक्टोबर रोजी विविध मिरजेच्या बालगंधर्व नाट्यगृह येथे विविध प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत 1 आक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत विविध प्रबोधनपर विषयावर आधारित प्रदर्शने सुद्धा आयोजित करण्यात आली आहेत. तसेच सायंकाळी 3 वाजता भारतीय स्वातंत्र्य संग्रामावर आधारित शाहीर देवानंद माळी यांचा पोवाडा, तसेच

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्था, रहिवाशी संस्था, सोसायटी, मनपाचे सफाईमित्र व स्वच्छता गृही यांचा सत्कार संपन्न होणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने घेणेत आलेल्या पर्यावरण पूरक गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे सकाळी 10 ते 5 यावेळेत आयोजित करण्यात आले आहेत. तसेच त्याच ठिकाणी भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना /नवे संकल्प, स्वच्छ भारत अभियानात योगदान आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे भव्य प्रदर्शनही आयोजित केले आहे.  या सर्व कार्यक्रमात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन *महापौर दिग्विजय सुर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वानी शासनाच्या कोव्हिड 19 च्या नियमांचे पालन करून करने बंधनकारक असणार आहे तसेच सर्वानी नियमांचे पालन करावे असेही आवाहनही महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.