सांगली निवारा भवन येथे डॉक्टर गेल ऑम्वेट यांना भावपूर्ण आदरांजली सभा झाली.
सभेमध्ये डॉ बाबूराव गुरव यांनी सांगितले की. गेल ऑम्वेट यांनी अमेरिकेतल्या एका घरंदाज श्रीमंत कुटुंबातून येऊनही त्यांनी भारतामध्ये भारतीय नागरिकत्त्व स्वीकारून डॉक्टर भारत पाटणकर यांच्याशी विवाह करून कासेगाव सारख्या खेड्या गावांमध्ये स्वतःला सामावून घेतले. डॉक्टर गेल या सहजपणे कष्टकरी महिलांच्या बरोबर मैत्री करुन वावरत असत. त्यांचा व्यासंग प्रचंड होता अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. यानंतर कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या श्रमिक मुक्ती चळवळीतील एक वैचारिक व परखड आवाज म्हणजे गेल ओमवेट. त्या समाजशास्त्रज्ञ, संशोधक, लेखक आणि स्त्रीवादी चळवळीत सतत कार्यात राहणाऱ्या डॉक्टर गेल ऑमवेट यांना आदरांजली अर्पण केली.
महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड गीता ठक्कर यांनी सांगितले की, डॉक्टर गेल यांचा स्त्रीवादी चळवळीत 1975 पूर्वीपासूनच महत्त्वाचा सहभाग होता. शहरापेक्षा खेड्यात स्त्रीवादी चळवळ अधिक घट्ट रुजलेली असल्याचे त्यांचे निरीक्षण होते. स्त्रियांच्या हक्कासाठी स्त्रियांनीच आवाज उठवला पाहिजे या भावनेने मधून त्यांनी काम केले. यानंतर शहाजी गडहिरे यांनी सांगितले की. ते विद्यार्थी असताना त्यांनी डॉक्टर गेल यांच्यापासून प्रेरणा घेतली. श्रमिक मुक्ती दलाचे नेते अडवोकेट कृष्णा पाटील यांनी सांगितले की. डॉ गेल यांनी लिहीलेल्या एकूण 31 पुस्तकांमधून आर्थिक, परंपरवादी, जातीय, धार्मिक, सामाजिक विषयांवर प्रहार केला आहे. हिंदू धर्माच्या धार्मिक शास्त्रावर टीका केली आहे. विविध जातींमध्ये एकता निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले वैचारिक योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्राध्यापक अमित थक्कर यांनी सांगितले की डॉक्टर गेल ऑम्वेट यांची बहुतांश पुस्तके इंग्रजीमध्ये आहेत ती सर्व पुस्तके महत्त्वाची असल्यामुळे त्याचे मराठी भाषांतर करून ती पुस्तके सर्व सामान्य जनते पर्यंत नेली पाहिजेत.
या स्मरण सभेमध्ये कॉम्रेड सुमन पुजारी, कॉ गोपाळ पाटील, साथी शिवाजी त्रिमुखे व कॉ विजय बचाटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.