Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वसंतदादांच्या नातवाला विकत घ्यायला, भाजपकडे तितकी ताकद नाही : विशाल पाटील

 वसंतदादांच्या नातवाला विकत घ्यायला, भाजपकडे तितकी ताकद नाही : विशाल पाटील


सांगली : आमच्यात पक्षांतर्गत भांडणे लागली म्हणून अनेकांना आनंद झाला, मला जिल्हाध्यक्ष पद मिळाले नाही म्हणून, अनेकांचे फोन आले, भाजपवाले  खुश झाले असतील. मात्र लक्षात ठेवा वसंतदादांच्या नातवाला विकत घेण्याऐवढी भाजपची ताकद नाही असा हल्ला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील  यांनी केला. येथील वसंतदादा स्मृतीस्थळी आयोजित दादा गटाच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

प्रदेश कार्यकारणीवरील निवडीनंतर ते नाराज असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी संवाद मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, " माझ्यावर अन्याय झाला म्हणून काही पक्षांना आनंद झाला. विशाल पाटील आमच्याकडे येतील असे त्यांना वाटले. पण आम्हाला सामावून घेण्यासाठी भाजपला अजून खूप मोठे घोटाळे करावे लागतील. आणखी आणखी अंबानी सारखे उद्योजक विकत घ्यावे लागतील, आमच्या घराण्याचे राजकारण सत्तेवर टिकलेले नाही. दादांच्या विचार पैशाने निर्माण झालेला नाही. आम्हाला गर्दीसाठी खर्च करावा लागत नाही. आम्हाला विकत घेणे भाजपला कधीही शक्य नाही. वसंत दादांच्या विचाराची ताकद वाढवली पाहिजे. माझ्या निवडीनंतर राज्यभरातून मला फोन आले. कोण कोणते तालुके हे मला माहितही नव्हते. आता दादांचे सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात विखुरले आहेत. त्यांना एकत्र करणे आवश्यक आहे. तसा माझा यापुढे प्रयत्न असेल.

मी नाराज नाही, निवड सामंजस्यानेच दादांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात प्रकाशबापूंनी सामुहिक नेतृत्व आणले. त्यातून मोहनदादांकडे जिल्हाध्यक्ष पद गेले. त्यांचे मला नेहमीच मार्गदर्शन मिळाले. आत्ताही मी या पदासाठी कोणाकडे गेले नव्हतो. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनीही मला तू पद का मागितले नाही ?, असे विचारले. पण मी कधीही ते मागणार नाही असे सांगितले. माझ्यासाठी राज्यभरातून काँग्रेस नेत्यांकडे फोन गेले होते. दादांच्या नातवाकडे लक्ष द्या असे म्हणत ते फोन गेले. दादांची राज्यात इतकी ताकद असताना मला जिल्ह्यात अडकून पडायचे नाही. विश्वजीत कदम.

म्हणतात ते योग्यच आहे की जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय सामंजस्याने झाला आहे. पक्षालाही मी राज्यात काम करण्यासाठी सक्षम वाटलो आहे.


आता अनुकंपावर नाही, अभ्यासावर सिद्ध होणार विशाल पाटील म्हणाले, 'जिल्हा बँकेत एकाला अनुकंपावर नोकरी मिळाली. त्याला पुढे व्यवसाय सुरु करण्यासाठी नोकरी सोडली आणि त्या जागेवर भावाला घेण्यासाठी तो एमडींना भेटला. एमडी म्हणाले अनुकंपा तत्वावर एकदाच लाभ मिळतो. राजकारणातही तसेच असते माझ्या भावाला अनुकंपावर यश मिळाले. मी ही तसा लाभ घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मात्र ते मला जमले नाही. त्यामुळे आता परीक्षा देऊन, अभ्यास करून मी यशस्वी होणार. त्याची ही सुरवात आहे. वारसा हक्काने फक्त प्रॉपर्टी मिळते. आमच्याकडे वारसा हक्काने दादांचे प्रेम आले आहे. राज्य काँग्रेसमय झाले पाहिजे. दादांच्या लोकांकडे राज्य आले पाहिजे.”

देश हित आणि गांधी कुटुंबासाठी निर्णय घेतोय जेव्हा देशहित असतं त्यावेळी जीवाची सुद्धा पर्वा करायची नसते, ही शिकवण स्वातंत्र्य लढ्यात वसंतदादांनी दिली आहे. आज देश एका वेगळ्याच पारतंत्र्यात आहे, निवडून जाणाऱ्या खासदारांना दिल्लीत बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही. ही पद्धत ब्रिटिश काळात होती, आज देशाला एकसंघ काँग्रेस विचारांची आहे, त्यामुळे राज्यपातळीवर काम करण्यासाठी मी राज्यपातळीवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे, तर राजीव गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी वसंतदादांनी स्वतः माघार घेतली होती, आज पुन्हा गांधी कुटुंबाला गरज आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय मी दादांचा नातू या नात्याने घेतला असल्याचे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.