आज किती स्वस्त झालं सोनं?
नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: गेले काही दिवस सोन्याचे दर कमी होत आहेत. आज मल्टी कमोडटी एक्सचेंज वर सोन्याचे दर आजही कमी झाले आहेत. आज 2 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात किरकोळ घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 47,065 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत आहेत. चांदीच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली आहे. याआधी काल सोन्याचे दर 0.06 टक्क्यांनी कमी झाले होते. त्यानंतर दर 47,090 रुपये प्रति तोळावर होते.
22 कॅरेट सोन्याचा भाव मुंबईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर 46,380 रुपये प्रति तोळा आहेत. तर दिल्ली आणि चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे प्रति तोळा 46,450 रुपये आणि 44,560 रुपये आहेत. बंगळुरुमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,300 रुपये प्रति तोळा आहे. SBI खातं ब्लॉक झाल्याचा मेसेज आला असेल तर सावधान!
अकाउंट रिकामं होण्याची भीती 12 वर्षात सर्वात कमी रिटर्न सोन्याने 2020 या वर्षात गुंतवणुकदारांना गेल्या 12 वर्षातील सर्वात कमी रिटर्न दिला आहे. या दरम्यान सोन्याच्या किंमतीत 13 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याची शुद्धता कशी तपासाल? जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे.
बीआयएस केअर अॅप च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल अर्थव्यवस्थेबाबत सुधारणेचे संकेत, ऑगस्टमध्ये 1 लाख कोटींपार मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. काही वेळात तुमच्या मोबाइल क्रमांकावर मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किंमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.