Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधून निवडणूक लढवून दाखवावी"; राकेश टिकैत यांचे आव्हान

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधून निवडणूक लढवून दाखवावी"; राकेश टिकैत यांचे आव्हान


नवी दिल्ली : भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक न लढता गुजरातमधून नशीब आजमवले पाहिजे असा सल्ला दिला आहे. हा सल्ला देण्यामागचे कारण देत गुजरातमधून निवडणूक लढली तर नरेंद्र मोदींचा पराभव होईल असा दावा त्यांनी केला.

हरियाणात शेतकऱ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर, रविवारी उत्तर प्रदेशात मुझफ्फनगरमधील महापंचायतीत शेतकरी संघटनांनी भाजपाविरोधातील आक्रमक आंदोलनाचे रणिशग फुंकले. इथे आगामी सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होत असून योगी सरकारविरोधात मिशन उत्तर प्रदेश सुरू केले जाणार असून २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे.

महापंचायतीला १० लाख शेतकऱ्यांची गर्दी झाल्याचा दावा मोर्चाने निवेदनाद्वारे केला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधून निवडणूक लढवली तर त्यांचा पराभव होईल. भाजपाने गुजरातचा विनाश केला आहे,' असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. 'या देशाची संपत्ती विकणारे कोण (मोदी) आहेत हे लोकांना समजले पाहिजे. त्यासाठी मुझफ्फरनगरसारख्या जंगी महापंचायती घेतल्या जातील. उत्तर प्रदेश वा उत्तराखंड भाजपपासून वाचवायचा नाही तर, संपूर्ण देशाला वाचवले पाहिजे.


मोदी सरकार शेतजमीन, महामार्ग, वीज, आयुर्वमिा कंपनी, बँका अशी देशाची सगळी संपत्ती अदानी आणि अंबानी यांच्यासारख्या कंपन्यांना विकत आहे. अवघा देश मोदी सरकारने विकायला काढला आहे,' असा आरोप करत राकेश टिकैत यांनी किसान महापंचायतीतील भाषणात केला. पश्चिम उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर हा टिकैत यांच्या शेतकरी संघटनेचा गड मानला जातो. २०१७ मध्ये या भागांतील ७२ विधानसभा मतदारसंघांत भाजपने वर्चस्व मिळवले होते.

उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र केले जाणार असून थेट भाजपविरोधात भूमिका घेतली जाईल. त्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये आंदोलनाची घोषणा केली आहे. पुढील तीन महिने दोन्ही राज्यांतील एकूण २० महसूल विभागांमध्ये तसेच, यासंदर्भात ९ व १० सप्टेंबर रोजी लखनौमध्ये शेतकरी संघटनांनी महत्त्वाची बैठक बोलावली असून त्यात उत्तर प्रदेशातील आंदोलनाची आखणी केली जाईल. तसेच, उत्तर प्रदेशातील संयुक्त किसान मोर्चाही स्थापन केला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.