पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिका दौऱ्यावर....
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधानांसह परराष्ट्रमंत्री, एनएसएस आणि एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क या शहरांना पंतप्रधान भेट देणार आहेत.
आंतराष्ट्रीय स्तरावर चालू असणाऱ्या घडामोडी पाहता हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. या भेटीत अफगाणिस्तान आणि तालिबानच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची धूरा संभाळल्यानंतर मोदी आणि बायडेन यांनी तीनवेळा ऑनलाईन मिटींगद्वार एकमेकांशी संवाद साधला. परंतु बायडेन आणि मोदी आज प्रथमच समोरासमोर भेटणार आहेत. बायडेन यांनी आयोजित केलेल्या कोरोना वैश्विक संमेलनात मोदी आज सहभागी होतील.
24 सप्टेंबर रोजी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षिय बैठक होईल. या बैठकीत भारत आणि अमेरिकेतील संबंधांवर चर्चा होईल. तसेच दोन्ही देशांतील व्यापार, गुंतवणूक संबंध, देशाच्या सुरक्षेचे प्रश्न, ऊर्जा भागिदारी यांसारख्या महत्वाच्या मुद्यांवर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.