Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सोमय्यांच्या टार्गेटवर ठाकरेंचे बंगले; अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार

सोमय्यांच्या टार्गेटवर ठाकरेंचे बंगले; अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार


कराड: राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर ठाकरे फॅमिली आली आहे. सोमवारी अलिबागला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंगले पाहणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे निघाले होते. पण सकाळीच त्यांना कराड येथे पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. ठाकरे कुटुंबाकडे 19 बंगले आहेत. हे बंगले कुठून आले? उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे बंगले घेतले आहेत. त्यामुळे सोमवारी अलिबागला जाऊन उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावाने घेतलेल्या बंगल्याची पाहणी करणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.

ही ठाकरे सरकारची ठोकशाही

त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला केला. ठाकरे सरकारची ठोकशाही आहे. गणेश विसर्जनापासून रोखलं, अंबाबाईच्या दर्शनापासून रोखलं, सीएसएमटी स्टेशनबाहेर मला रोखलं, ट्रेन मिळणार नाही हे पाहिलं, धक्काबुक्की केली. मी विचारलं कोणत्या अधिकाराअंतर्गत रोखताय, त्यावर त्यांनी मुंबईबाहेर जाऊ न देण्याचा ठाकरे सरकारने आदेश दिल्याचं सांगितलं, असा दावा त्यांनी केला.

आम्ही कोर्टात जाणार

आम्ही हिंदू म्हणून रोखता? उद्धवजी तुम्ही हिरवा रंग धारण करा. मला विसर्जनापासून, आंबेबाईच्या दर्शनापासून रोखता, उद्धव ठाकरेंचा उद्धटपणा चालणार नाही. आम्ही हायकोर्टात जाणार, चुकीच्या आदेश देणाऱ्या मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी, मुंबई पोलिस कमिशनरवर कारवाई व्हावी यासाठी कोर्टात जाणार आहे, असं सांगातनाच ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? तर माननीय हसन मुश्रीफ हे कागलमध्ये येणार आहेत, त्यांच्या स्वागतासाठी जनसमुदाय दाखल होणार आहे. त्यावेळी किरीट सोमय्यांना गनिमीकाव्याने धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. माझी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे मागणी आहे की, ही अधिकृत ऑर्डर तुमच्या सरकारने काढली आहे, तर ही गुपीत माहिती कुठून दिली?, असा सवाल त्यांनी केला.

माहिती सुरक्षा यंत्रणेला का दिली नाही

ठाकरे सरकारने माजी सुरक्षा काढून घेतली आहे. मोदी सरकारने मला संरक्षण दिलं आहे. त्याच्याशीही तुमची गद्दारी? माझ्यावर गनिमीकाव्याने हल्ला होणार असल्याची माहिती तुमच्याकडे आली तर ती माहिती तुम्ही सुरक्षा यंत्रणांना का दिली नाही?, असा सवालही त्यांनी केला.

माझ्यावर हल्ला व्हावा ही मुख्यमंत्र्यांची इच्छा

माझ्यावर हल्ला व्हावा ही मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. याचं उत्तर दिलीप वळसे पाटील यांना द्यावं लागेल. मुश्रीफ यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की गुंड? की राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का? हे आधी स्पष्ट करा, असं आव्हान त्यांनी केलं. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.