Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उद्यापासून राज्यात सलग तीन दिवस जोरदार पाऊस, 'या' भागांसाठी अलर्ट जारी

 उद्यापासून राज्यात सलग तीन दिवस जोरदार पाऊस, 'या' भागांसाठी अलर्ट जारी


मुंबई : राज्यात मंगळवारपासून पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसानही झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं बऱ्याच ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला जातोय.

राज्यात पुढील दोन तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. मुसळधार पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावल्यामुळे आता 4 सप्टेंबर ते 6 सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस कोसळणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात उद्यापासून सलग तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

4 सप्टेंबरसाठी बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर 5 आणि 6 सप्टेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुसळधार पाऊस पडणार असल्यानं अनेक ठिकाणी अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. 5 सप्टेंबरसाठी हवामान विभागानं पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.