चंद्रकांत पाटील सर्वांचे मास्टरमाईंड'', सोमय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रीफांचा घणाघात..
मुंबई, 20 सप्टेंबर: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा उघड केला. गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला. या आरोपानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळले आहेत. यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांचे मास्टरमाईंड आहेत, असा घणाघात मुश्रीफ यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.