Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री भ्रष्टाचारी..

 गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल : महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री भ्रष्टाचारी..


पुणे : राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाहीत. त्यामुळे अन्नदाता भाज्या फेकून देऊ लागला आहे. दुधाला दर नाही, बैलगाडा शर्यत चालू होतं नाही, जनावरांचे बाजार दोन-दोन वर्षे बंद आहेत. आणि हे आघाडीमधील मंत्री शानमध्ये मुंबईत बसतात. जर आज छपत्रती शिवाजी महाराज असते. तर त्यांनी या सरकारमधील बलात्कारी, भ्रष्टाचारी, जातीयवादी मंत्र्यांना आणि हे सरकार निर्माण करणाऱ्यांना टकमक टोकावरून यांचा कडेलोट केला असता असं म्हणत पडळकरांनी मविआ सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

जुन्नर येथील शिवसेनेच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके यांनी नुकताच मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. याच निमित्ताने जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे झालेल्या सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अगदी सरकारवर आरोप केले आहेत.

पन्नास वर्षे पवारांची सत्ता असूनही जनतेवर अन्याय का?

पवारांच्या बारामतीत आणि जुन्नर तालुक्यात ५० वर्षे पवारांची सत्ता आहे. एवढ्या वर्षात पवारांच्या घरात पाणी भरते, मात्र तरीही पुणे जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते सांगतात की, आम्ही शेतकऱ्यांचे नेते आहोत. कष्टक-यांचे नेते आहोत. मात्र ज्या बारामती विधानसभा मतदार संघात यांनी निवडणूक लढवली त्या मतदार संघातल्या ४४ गावात शेतीला पाणी नाही, पिण्याला पाणी नाही. तीच अवस्था जुन्नरमधील अन् पठारावर आहे. ज्या तालुक्यात ५ धरणे आहेत त्या तालुक्यातील जनता आज पाण्यासाठी उपाशी आहोत. याच्यापेक्षा मोठं पाप या पवार कुटुंबियांचं कोणतच असू शकत नाही. जर तुमच्या घरात ५० वर्ष सत्ता असेल तर या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.

बैलगाडा शर्यत सुरू झाल्या शिवाय राहणार नाही

बैलगाडा मालकांच्या भावनाशी सरकार खेळत असून गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घोषणा केली की, बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे माघारी घेणार मात्र ८ दिवस होऊनही अद्याप एकही पोलीस स्टेशनला पत्र किंवा आदेश आले नाहीत. दिलीप वळसे पाटलांना प्रश्न करत पडळकर म्हणाले की, सांगलीत शेतकऱ्यांना आरोपी म्हणून पोलीस स्टेशनला का बसवलं. राजकारण म्हणून नाही तर मी सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून बोलतोय. मी संघर्ष करायला तयार आहे, बैलगाडा शर्यत सुरू झाल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा पडळकर यांनी यावेळी दिलाय.

पवारांनी अमोल कोल्हेंना गिऱ्हाईक म्हणून राज्यभर फिरवलं

बैलगाड्याच नाव घेत आम्ही इथे मत मागायला आलो नाही असं सांगत शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव आणि विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनाही पडळकर यांनी लक्ष केले. भाजपाचा प्रत्येक नेता बैलगाडी शर्यत सुरू होण्यासाठी तुमच्या सोबत आहे असं म्हणत बैलगाडा काय मालिकेत शूटिंग करायची नाही तर प्रत्यक्षात सुरू करायची आहे. बिचाऱ्या अमोल कोल्हेची पवारांनी फार वाईट अवस्था केली अशी टिपण्णी पडळकरांनी केली. पवारांच्या पार्टीत २०१९ च्या अगोदर कोणी उभं राहायला माणूस नव्हता म्हणून यांनी मालिकेतला गडी आणला आणि शिवस्वराज्य यात्रेचा प्रमुख बनवला आणि राज्यभर फिरवला. पण अमोल कोल्हेच्या लक्षात आलं नाही की पवारांना आता गिऱ्हाईक नाही म्हणून तुम्हाला फिरवलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.