Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घसरण होऊनही सोन्याचे दर 45 हजारांपेक्षा जास्त..

 घसरण होऊनही सोन्याचे दर 45 हजारांपेक्षा जास्त..


नवी दिल्ली, 18 सप्टेंबर: सोन्याच्या दरात  शनिवारी घसरण पाहायला मिळाली आहे. शनिवारी सोन्याचे दर 45,390 रुपये प्रति तोळावर  पोहोचले आहेत. सोन्याचे दर 45,780 रुपये प्रति तोळावरून कमी होऊन 45,390 रुपये झाले आहेत. तर चांदीचे दर 61,600 रुपये प्रति  किलोवर आहे. गुडरिटर्न्स वेबसाइटने हे दर जारी केले आहेत. सोन्याची खरेदी करणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.

भारतातील विविध शहरात सोन्याचे दर वेगवेगळे असतात. कारण एक्साइज ड्युटी, राज्यांतील कर आणि घडणावळीसाठी लागलेले शुल्क यामुळे सोन्याचे दर वेगवेगळे असतात. 22 कॅरेट सोन्याचा दर गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, आज नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,550 रुपये प्रति तोळा आहे. तर मुंबईमध्ये 22 कॅरेटचा दर 45,390 रुपये प्रति तोळा आहे.

चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 43,710 रुपये प्रति तोळा आहेत. 1 लाखाचे झाले 7.50 लाख, अवघ्या 6 महिन्यांत 'या' शेअरनं दिला 650% परतावा 24 कॅरेट सोन्याचा दर गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, 24 कॅरेट सोन्याच्या दरातही आज घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46,780 रुपये प्रति तोळा होता. आज या शुद्धतेच्या सोन्याचा दर 46,390 रुपये प्रति तोळा आहे.

चांदीचे आजचे दर सोन्यासह आज चांदीच्या किंमतीत देखील घसरण पाहायला मिळाली आहे. वेबसाइटवरील आकड्यांनुसार चांदीचे दर 1200 रुपयांनी कमी झाले आहेत. शुक्रवारी चांदीचे दर 62,800 रुपये प्रति किलो होते. त्यामध्ये घसरण होऊन आज दर 61,600 रुपये प्रति किलोग्रॅम आहेत.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.