46000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याचे दर, रेकॉर्ड हायपेक्षा सोनं 10000 रुपयांनी स्वस्त
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: शुक्रवारी भारतीय बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात स्थिर पाहायला मिळाले आहे. सुरुवातीच्या सत्रात सोन्यात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. या आठवड्यात सोन्याच्या किंमतींवर दबाव पाहायला मिळतो आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ऑक्टोबर गोल्ड फ्युचरची किंमत सकाळी 09.15 वाजता 0.03 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचे दर 46,060 रुपये प्रति तोळावर आहेत. तर चांदीचे दर शुक्रवारी 0.25 टक्क्याने वधारले आहेत. या वाढीनंतर चांदीच्या किंमती प्रति किलो 61,231 आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारले आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ग्लोबल मार्केटमध्ये स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी वधारले असून आज दर $1,758.10 प्रति औंस आहेत. तर अमेरिकन गोल्ड फ्युचरची किंमत 0.2 टक्क्यांनी वाढली असून दर $1,759.50 प्रति औंस आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.