Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्ड ड्रिंकच्या एका बाटलीची किंमत 36 लाख रुपये! डिस्काउंटच्या नादात फसला....

 कोल्ड ड्रिंकच्या एका बाटलीची किंमत 36 लाख रुपये! डिस्काउंटच्या नादात फसला....

वॉशिंग्टन : अमेरिकेत  कोल्ड ड्रिंकची  संपूर्ण रक्कम न भरल्याबद्दल एका व्यक्तीला मोठा भुर्दंड बसला आहे. या व्यक्तीला 50,000 डॉलर म्हणजेच 36 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्याला सात वर्षे तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. दरम्यान, या आरोपी व्यक्तीने कोर्टाला विनंती केली आहे की, एखाद्या किरकोळ गुन्ह्यासाठी अशी कठोर शिक्षा देऊ नये. 36 लाख देण्यास तो सक्षम नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. 

अशी झाली गडबड...

'न्यूजवीक'च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनिया येथे राहणाऱ्या 38 वर्षीय जोसेफ सोबोलवेस्की याला कोल्ड्रिंक्ससाठी पूर्ण रक्कम न दिल्याबद्दल पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, जोसेफ सोबोलवेस्की 23 ऑगस्ट रोजी एका दुकानात गेला होता, जिथे कोल्ड्रिंक्स बाटल्यांवर डिस्काउंट मिळत होता. या डिस्काउंटच्या नादात तो पूर्ण पैसे न देता निघून गेला.

43 सेंट कमी केले होते पेमेंट

दुकानात एक बोर्ड होता ज्यावर लिहिले होते की, '​​3 डॉलरमध्ये दोन बाटल्या'. जोसेफ सोबोलवेस्कीने काउंटरवर 2 डॉलर दिले आणि एक बाटली घेऊन निघून गेला. ज्यावेळी त्याने दोन बाटल्या विकत घेतल्या तरच ही ऑफर मिळणार होती. म्हणजेच एक बाटली 2.29 डॉलरला होती, तर 1.50 डॉलरला नव्हती. यादरम्यान, या दुकानातील कॅशिअरला 43 सेंट कमी दिल्याचे समजताच ती जोसेफ सोबोलवेस्कीच्या मागे धावली. मात्र, तोपर्यंत तो तिथून आपल्या कारमध्ये बसून निघून गेला होता.

कॅशिअरने पोलिसांना कळवले

यानंतर कॅशिअरने पोलिसांना बोलावले. याप्रकरणी पेपेन्सिल्व्हेनिया स्टेट पोलिसांनी जोसेफ सोबोलवेस्की पकडले आणि त्याला अटक केली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले की, जोसेफ सोबोलवेस्की 50,000 डॉलरचा दंड भरावा लागेल. तसेच, जर जोसेफ सोबोलवेस्की दोषी आढळल्यास त्याला किमान 7 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो.

जोसेफ सोबोलवेस्कीला चोरीच्या आरोपावरून तिसऱ्यांदा अटक करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. 10 वर्षांपूर्वी त्याने आपल्या कारमध्ये गॅस भरला आणि पैसे न देता निघून गेला. त्याचप्रमाणे, 2011 मध्ये त्याने काही चप्पल चोरी केली होती. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. यापूर्वीही त्याने 7 वर्षे तुरुंगात काढली आहेत. दरम्यान, वारंवार गुन्हे केल्याबद्दल त्याला इतका दंड ठोठावण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.