अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये पटकावलं दुसरं पदक
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लेखराने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. 50 मीटर एअर रायफल प्रकारात तिनं कांस्य पदक जिंकलं आहे. याआधी अवनीने 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.
19 वर्षीय अवनी प्ररालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला आहे. अवनीने संयम राखत 249.6 पॉईंटसह विश्व विक्रमाची बरोबरी केली आणि पदकही जिंकलं आहे. चीनच्या कुइपिंग झांगने 248.9 पॉईंट मिळवत रजत पदक जिकलं आणि यूक्रेनच्या इरियाना शेकेत्निकने कांस्य पदक जिंकलं.
अवनी लेखराने सामन्याची सुरुवात वेगवान केली. तिने 10 पॉईंटसह आपल्या खेळात सातत्य राखलं.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत केवळ दोन वेळेला अवनीला 10 पॉईंटपेक्षा कमी स्कोअर करता आला. यामुळे ती पहल्या फेरीत दुसऱ्या क्रमांकावर होती. नॉक आऊट राऊंडमध्ये अवनी अव्वल राहिली आणि तिने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर चांगली मात केली. अखेर 249.6 पॉईंटसह अवनीने सामना जिंकला. यापूर्वी पात्रता फेरीत 621.7 स्कोर करत अवनी सातव्या क्रमांकावर राहिली.
कोण आहे अवनी?
अवनी मूळची जयपूर शहरात राहणारी आहे. तिने कायद्याचे शिक्षण घेतलं आहे.
2012 मध्ये झालेल्या एका कार अपघातानंतर ती स्पायनल कॉर्डसंदर्भातील एका आजाराने ग्रस्त आहे. या अपघातानंतर ती केवळ व्हिलचेअरनेच चालू शकते. पण ती थांबली नाही. शूटिंगसाठी तिने आपल्या प्रयत्नांत सातत्य राखलं. साधारण 2015 पासून अवनीने शूटिंगचा सराव सुरू केला. जयपूरमधील जगतपूरा क्रीडा संकुलात अवनी सराव करत होती.
अवनीने क्रीडा क्षेत्रात जावं ही तिच्या वडिलांची इच्छा होती. सुरुवातीला अवनीने शूटींग आणि तिरंदाजी दोन्हीसाठी प्रयत्न केला. पण तिला शूटिंगमध्ये अधिक रस होता. अभिनव बिंद्रा यांच्या कामगिरीमुळे तिला प्रेरणा मिळाल्याचं ती सांगते.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणं ही तिची इच्छा होती जी आता पूर्ण झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.