कोवीड १९ महालसीकरण अभियानात जिल्ह्यात एक लाख 40 हजारांहून अधिक जणांनी घेतली लस
सांगली, दि. 15, : कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी जिल्ह्यात दिनांक 15 सप्टेंबर 2021 रोजी 18 वर्षावरील सर्व नागरिकांसाठी कोवीड १९ महालसीकरण अभियान सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुमारे 1 लाख 40 हजारांहून अधिक नागरिकांनी कोरोना लस घेतली. यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत 600 लसीकरण केंद्रे कार्यान्वीत करण्यात आली आहेत. महालसीकरण अभियान युध्दपातळीवर राबवून जिल्ह्यातील आरोग्य विभागाने आदर्शवत काम केले आहे. तसेच कोरोना लस घेण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आरोग्य विभाग व नागरिकांचे अभिनंदन केले. तसेच यापुढील काळातही कोरोनावर मात करण्यासाठी ज्यांनी लस घेतली नाही त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.
वारंवार हात धुणे, मास्क वापरणे व योग्य सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा अवलंब यापुढील काळातही काटेकोरपणे करावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.